एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नाशिकमध्ये जगातील सर्वात उंच प्लॅस्टिक बॉटल मॉन्स्टर
नाशिक : ‘पर्यावरण’ वाचवा हा संदेश देण्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीनं ईगतपुरीतल्या आपल्या प्रकल्पात जगातला सर्वात उंच प्लॅस्टिक बॉटल मॉन्स्टर अर्थात प्लास्टिक प्रदूषणाच भूत उभं केलं आहे. 21 मीटर उंचीचा हा मॉन्स्टर जगातला सर्वात उंच मॉन्स्टर असून याची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे.
भारत स्वच्छता अभियान अंतर्गत महिंद्राच्या सुमारे दीड हजार कर्मचाऱ्यांनी नाशिक आणि परिसरात स्वच्छता मोहिम राबवली होती. त्यावेळी महिंद्राच्या दीड हजार कर्मचाऱ्यांनी पर्यावरणाला हानिकारक असलेल्या 1 लाख 300 प्लॅस्टीक बॉटल्स गोळा केल्या.
मोठ्या प्रमाणावर जमा झालेला हा प्लॅस्टिक कचरा पर्यावरणासाठी किती घातक आहे याचा संदेश नागरिकांना देण्यासाठी महिंद्रानं मॉन्स्टर बनवण्याचा निर्णय घेतला. सध्या इटलीत 42 हजार प्लास्टिक बॉटल्सचा असलेला मॉन्स्टर असून तो जगातला सर्वात उंच मॉन्स्टर आहे. मात्र, आता महिंद्राच्या या मॉन्स्टरची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे.
शुक्रवारी हा मॉनस्टर उभारण्यात आला. यावेळी महिंद्रा अँड महिंद्राचे उपाध्यक्ष हिरामण आहेर, जनरल मॅनेजर नसिर देशमुख आदींसह मान्यवर उपस्थित होते. प्लास्टिक बॉटल्सवर बंदी टाकून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याबरोबरच कृतीही महिंद्रानं केली असल्याची माहिती महिंद्रा तर्फे यावेळी देण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement