एक्स्प्लोर
वसईत शाळेच्या आवारात तरुणीचा मृतदेह सापडला

वसई : वसईच्या विद्या विकासनी शाळेच्या आवारात एका तरुणीचा नग्नावस्थेत मृतदेह आढळला. शाळेच्या मागच्या बाजूस असणार्या शेतात कुजलेल्या अवस्थेत हा मृतदेह सापडला आहे. या तरुणीचं वय अंदाजे 25 ते 30 वर्ष आहे. शाळेच्या बाजूच्या आवारात काही मुलं काल (3 जून) दुपारी क्रिकेट खेळत असताना त्यांचा बॉल शाळेच्या कम्पाऊंडमध्ये गेला. बॉल आणण्यासाठी गेलेल्या मुलांना हा मृतदेह दिसला. या घटनेची माहिती वालिव पोलिसांनी देण्यात आली. या मुलीचा बलात्कार करुन, तिची हत्या केल्याचा अंदाज स्थानिकांनी वर्तवला आहे. तर पोलिसांनी ही हत्या असल्याचं सागितलं आहे. तरुणीचा मृतदेह ज्या ठिकाणी सापडला, तिथे जवळच एक रुमही आहे. त्यामुळे हे काम कोणा एका व्यक्तीचं नसून, यात चार ते पाच जणांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेहाचा पंचनामा केल्यावर हत्येचं नेमकं कारण स्पष्ट होईल. दरम्यान मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने, तो त्याच ठिकाणी पुरण्यात आला.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
मुंबई
लाईफस्टाईल
कोल्हापूर























