एक्स्प्लोर
अखेर महिलांचा त्र्यंबकेश्वराच्या गाभाऱ्यात प्रवेश
![अखेर महिलांचा त्र्यंबकेश्वराच्या गाभाऱ्यात प्रवेश Women Enters Inner Sanctum Of The Trimbakeshwar Temple अखेर महिलांचा त्र्यंबकेश्वराच्या गाभाऱ्यात प्रवेश](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/04/21073209/Trimbakeshwar_Women-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : शनी चौथरा प्रवेशाननंतर आता त्र्यंबकेश्वराच्या गर्भगृहातही महिलांनी प्रवेश मिळवला आहे. स्वराज्य महिला संघटनेच्या अध्यक्षा विनीता गुट्टे यांच्यासह चार महिलांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करुन दर्शन घेतलं.
स्वराज्य संघटनेच्या महिलांनी आज सकाळी सव्वासहाच्या सुमारास कडेकोट पोलिस बंदोबस्तात गर्भगृहात प्रवेश केला केला.
शनी मंदिरात महिलांच्या प्रवेशाचा लढा चालू असताना त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात प्रवेश करण्याची मागणी जोर धरु लागली होती. स्वराज्य संघटनेच्या महिला यासाठी प्रयत्नशील होत्या. मात्र मंदिर प्रशासन आणि स्थानिक भाविकांचा त्यांना प्रवेश देण्यास विरोध होता.
अटींना विरोध केल्याने महिलांना मारहाण
महिलांचा गर्भगृह प्रवेश टाळण्यासाठी त्र्यंबकेश्वर प्रशासनाने कडक अटी, शर्ती लागू केल्या आहेत. त्यानुसार सकाळी 6 ते 7 ही दर्शनासाठीची वेळ म्हणून निश्चित करण्यात आली आहे. बुधवारी स्वराज्य संघटनेच्या महिला ठरवून दिलेल्या वेळेनंतर प्रवेश करण्यासाठी आल्या. मात्र दर्शनाची वेळ संपल्याचं कारण देत मंदिर प्रशासन आणि गावकऱ्यांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या अटींना विरोध केल्यानंतर गर्भगृहासमोर असलेल्या तथाकथित संस्कृतीरक्षकांनीच महिलांना अमानुष मारहाण केली. या प्रकरणी 150 गावकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र आज स्वराज्य संघटनेच्या महिलांनी मंदिर प्रशासनाने दर्शनासाठी निश्चित केलेल्या वेळेतच गर्भगृहात प्रवेश केला.
संबंधित बातम्या
त्र्यंबकेश्वर गर्भगृहासमोरच महिलांना अमानुष मारहाण
तृप्ती देसाई यांना त्र्यंबकेश्वर परिसरात धक्काबुक्की
आता हाजी अली दर्गा प्रवेशासाठी तृप्ती देसाईंचा एल्गार !
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यातही महिलांना प्रवेश?
स्त्रीशक्तीचा विजय, अखेर महिलांचा शनी चौथऱ्यावर प्रवेश
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
भारत
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)