एक्स्प्लोर
अनैतिक संबंधांना नकार, सूडापोटी तरुणाने महिलेच्या मुलीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे
रायगड जिल्ह्यातील खोपोलीमध्ये राहणारी चार वर्षांची चिमुरडी मंगळवार सकाळपासून बेपत्ता होती. बुधवारी सकाळी घरापासून काही अंतरावर असलेल्या झाडीत तिचा मृतदेह आढळला, तोही धडापासून डोकं वेगळं केलेल्या अवस्थेत.
रायगड : महिलेने अनैतिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे खोपोलीतील तरुणाने तिच्या चार वर्षीय मुलीची निर्घृण हत्या केली. क्रौर्याची परिसीमा म्हणजे आरोपीने हत्येनंतर चिमुरडीच्या शरीराचे दोन तुकडे केले. महिलेच्या घराजवळ राहणाऱ्या तरुणाने हा अमानुष प्रकार केला.
रायगड जिल्ह्यातील खोपोलीमध्ये राहणारी चार वर्षांची चिमुरडी मंगळवार सकाळपासून बेपत्ता होती. दिवसभर शोध घेऊनही तिचा शोध लागला नाही. बुधवारी सकाळी घरापासून काही अंतरावर असलेल्या झाडीत तिचा मृतदेह आढळला, तोही धडापासून डोकं वेगळं केलेल्या अवस्थेत.
या घटनेमुळे खोपोली परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी तपास करताना एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलं. पोलिसांच्या चौकशीत घराजवळच राहणाऱ्या 27 वर्षीय तरुणाने हत्येची कबुली दिली.
आरोपीने अनेकवेळा चिमुरडीच्या आईशी अनैतिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिने ठाम नकार देत आरोपीला आपल्या घरी येण्यासही मज्जाव केला होता. या घटनेचा राग मनात धरुन आरोपीने चिमुरडीची निर्घृण हत्या केली असल्याचं कबूल केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement