
Today Weather : महाराष्ट्र गारठला, धुळ्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद
पुढील 48 तासांत उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडीचा जोर वाढणार आहे. 21 डिसेंबरच्या सकाळपर्यंत अनेक शहरांमधील किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याचा अंदाज वेध शाळेने वर्तविला आहे.

Today Weather : गेल्या चार-पाच दिवसांपासून देशभरात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. महाराष्ट्रातही अनेक शहरे गारठली आहेत. आज राज्यामध्ये धुळे जिल्ह्यात सर्वाधिक कमी तापनाची नोंद झाली. धुळे जिल्ह्यातील तापमान आज 7 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. त्यामुळे जिल्ह्यात चांगलाच गारठा वाढला होता. दरम्यान पुढील 48 तास ही थंडी अशीच राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
पुढील 48 तासांत उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडीचा जोर वाढणार आहे. 21 डिसेंबरच्या सकाळपर्यंत अनेक शहरांमधील किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भातील तापमानातही घट होणार आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील काही भागातील तापमान 8-9 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रात शीत लहरीची कोणतीही संभावना नाही. असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
22 डिसेंबरनंतर विदर्भ सोडून इतर भागातील किमान तापमानात वाढ होणार आहे. विदर्भात 23 डिसेंबरनंतर थंडीचा जोर कमी होणार आहे.
'या' शहरांचा पारा झाला कमी
आज परभणी जिल्ह्यातही थंडी वाढली आहे. परभणीत पारा 10.6 अंशांवर घसरला आहे. तर, थंडीमुळे अनेक ठिकाणी धुकं पसरल्याचंही पाहायला मिळत आहे. मुंबई-गोवा हायवेवरही धुक्याची चादर पसरली होती. पनवेल आणि आसपासच्या परिसरासह वडखळ ते माणगाव दरम्यान धुक्याची दाट चादर हापायला मिळाली.
- निफाड किमान तापमान - 10
- नागपूर किमान तापमान 13.4
- नाशिक - 12.5
- वाशिम -13
- बुलढाणा 11.2
- परभणी 10.06
- जळगाव किमान तापमान 11.3
महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
