लवकरच किराणा दुकान, बेकरीमध्ये वाईनची विक्री सुरु करण्याचा सरकारचा विचार
सध्या राज्यात 70 लाख लिटरची दरवर्षी विक्री होत असते. सरकारच्या नव्या धोरणामुळं हा आकडा 1 कोटींवर कोटी लिटरपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे.
![लवकरच किराणा दुकान, बेकरीमध्ये वाईनची विक्री सुरु करण्याचा सरकारचा विचार Wine in grocery The government plans to start selling wine in grocery stores and bakeries soon लवकरच किराणा दुकान, बेकरीमध्ये वाईनची विक्री सुरु करण्याचा सरकारचा विचार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/15/9b03bd29dbd1d39e8f2a92f173529cf6_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्य सरकारनं किराणा दुकान, डिपार्टमेंटल स्टोर, बेकरीमध्ये वाईन विक्रीची परवानगी देण्याची तयारी सुरु केली आहे. दुकानांमध्ये एक लिटर वाईनमागे 10 रुपये अबकारी कर लावण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. या निर्णयामुळं राज्य सरकारच्या तिजोरीत पाच कोटींची भर पडणार आहे. या निर्णयामुळं राज्य सकराच्या तिजोरीत जास्त नव्हे तर पाच कोटींची भर पडणार आहे. मात्र वाईनची किती विक्री होते याची नोंद सरकारला ठेवता येणार आहे.. सध्या राज्यात दरवर्षी वाईनच्या 70 लाख बॉटल्सची विक्री होते. सरकारच्या नव्या धोरणामुळं हा आकडा 1 कोटींवर पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय.
सध्या राज्यात 70 लाख लिटरची दरवर्षी विक्री होत असते. सरकारच्या नव्या धोरणामुळं हा आकडा 1 कोटींवर कोटी लिटरपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. मात्र, सरकारनं काल वाईनवर प्रति लिटर 10 रुपयांचा अबकारी कर जाहीर केलाय त्यामुळे वाईन थोडी महाग होणार आहे. दुसरीकडे, अनेक बेकरी पदार्थांमध्ये वाईनचा उपयोग होत असतो. बहुतेक वाईनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे वाईनचा वापर चवीसाठी केला जात असतो. त्यामुळे दैनंदिन किराणा दुकानात होणाऱ्या वाईनची विक्री ही बीअरच्या धर्तीवर कॅनमधून विक्रीला येऊ शकते.
2000 सालापासून द्राक्ष शेतकरी बाजार देशांतर्गत वाईन निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणताही कर नाही, तर त्यापूर्वी कर खूपच कमी होता. नवीन कर लागू केल्याने राज्याला केवळ पाच कोटी रुपयांचा महसूल मिळण्याचा अंदाज आहे. ह्याचसोबत उत्पादनशुल्क प्रशासनाला बाजारात विकल्या जाणाऱ्या वाईनच्या बाटल्यांवर लक्ष ठेवण्यास मदतही मिळणार आहे.
उत्पादन शुल्कानं याआधीच आयात व्हिस्कीवरील शुल्क 300 टक्क्यांवरून 150 टक्क्यांवर आणले आहे. दैनंदिन दुकानात वाईन विक्रीचा निर्णय काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. अशातच जर तुम्ही दैनंदिन किराणा दुकानात किंवा बेकरीमध्ये गेलात तर यापुढे तुम्ही इथे वाइन देखील खरेदी करता येणार आहे.
संबंधित बातम्या :
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)