एक्स्प्लोर
पोटगीच्या वादातून पत्नीची हत्या, पळून जाणाऱ्या पतीचा अपघाती मृत्यू
![पोटगीच्या वादातून पत्नीची हत्या, पळून जाणाऱ्या पतीचा अपघाती मृत्यू Wife Murder And Husband Road Accident Death In Aurnagabad पोटगीच्या वादातून पत्नीची हत्या, पळून जाणाऱ्या पतीचा अपघाती मृत्यू](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/12032410/Crime.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
औरंगाबाद: पोटगीच्या वादातून पत्नीची चाकून हत्या करुन पळून जाणाऱ्या पतीचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे.
औरगांबादमधील विश्वासभारती कॉलनीतील वक्रतुंड कॉम्प्लेक्समध्ये पत्नीची हत्या करुन पळून जाणाऱ्या पतीचा औरंगाबाद-नाशिक रोडवर अपघाती मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. अश्विनी गुरुले असं मृत महिलेचे नाव आहे.
अश्विनी आणि तिचा पती मनोज गुरुले हे गेल्या तीन वर्षापासून वेगळे राहत होते. तेव्हापासून त्यांच्यामध्ये पोटगीवरुन वाद सुरु होते. आरोपी मनोज हा एका सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनिअर म्हणून काम करीत होता. काल या दोघांमध्ये पोटगीवरुन पुन्हा वाद झाला. यावेळी मनोजनं पत्नी अश्विनीच्या पोटात चाकूनं वार करुन तिची हत्या केली.
पत्नीच्या हत्येनंतर कारनं पळून जाताना मनोजचा आपल्या गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाल. दरम्यान, या दाम्पत्याला ८ वर्षाची मुलगी आहे. औरंगाबाद पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
राजकारण
भारत
अकोला
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)