एक्स्प्लोर
...दारु, मटका, जुगाराकडे सरकारचं दुर्लक्ष का?
लातूर: महाराष्ट्रात सर्वाधिक विकलं जाणार वर्तमानपत्र, साप्ताहिक कुठलं? तुम्ही रोज वाचत असलेल्या दैनिक..? की तुमचं आवडत साप्ताहिक..? नाही... तर साप्ताहिक झुबिडुबी आणि दैनिक मर्द सर्वाधिक खपतात. त्यासाठी प्रकाशकांना वितरण व्यवस्थेचीही गरज नाही.
लातूर, उस्मानाबादचं बसस्थानक परभणीच्या रेल्वेस्टेशन परिसरात मिळणारी ही प्रकाशन विकत घेण्यासाठी हायप्रोफाईल ग्राहक चातकांसारखी वाट पाहतात. गेली 60 वर्षे सुरु असलेल्या मटका नावाच्या समांतर अर्थसाखळीत अलीकडेचं जोमानं वाढलेल्या स्वतंत्र बाण्याच्या प्रकाशनांची माहिती आहे ही. हा कोपर्डीसारख्या घटना का घडतात याचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे.
मटक्याच्या साखळीला चालवण्यासाठी सुमारे 112 वर्तमानपत्रं आणि तेवढीच साप्ताहिक बाजारात धुमाकुळ घालत आहेत.
मराठी हिंदी इंग्रजी आणि कन्नड भाषेत. कोणीतरी हिराबाई राठोड नावाच्या बाई, प्रोफेसर सदानंद नावाचे बाप्ये याचे संपादक.
एका अंकाच्या किंमतीत तुमचं महिन्याचं पेपर बिल होईल.
चार पानी दैनिकाची किंमत 12 रुपये, तेवढ्याच पानाचं साप्ताहिक 500 रुपयाला. साप्ताहिक झुबिडूबी, ज्योतिष महासंग्राम 25 रुपयाला. गरीबांची धनलक्ष्मी, घोडे की नाल 7 रुपयाला, करोडपती, शिवगंगा, जादूगार २० रुपयाला. ज्यांचे आकडे जुळले ते दैनिक साप्ताहिक ब्लँकमध्ये 100 रुपयाला झेराँक्स. या प्रकाशनांवर शेवटी जाता जाता वैधानिक इशारा लिहिला आहे. हे संख्याशास्त्र आहे याचा दुरुपयोग करू नका.
महाराष्ट्रातली बहुतेक बस स्थानकं, रेल्वे स्टेशन्सवर ही प्रकाशनं विक्रीला आहेत. प्रत्येक दैनिकाच्या एका-एका स्टॉलवर पाचशे प्रती सहज खपतात. आजही गाव गावच्या पारावर मटक्याच्या आकड्याची चर्चा असते.
नेते सभागृहात कितीही जोरात बोलू दे, यातल्या अनेकांना माहिती आहे महाराष्ट्राच्या शिवाराशिवारात देशीदारुच्या भट्ट्या आहेत. ही खरी कारण आहेत ज्यामुळं कोपर्डीसारखी घटना घडते
VIDEO:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement