एक्स्प्लोर
Advertisement
पवारसाहेब, खा. महाडिकांच्या भूमिकेबाबत गप्प का?
कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यावर, भाजपशी जवळीक करणाऱ्या स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या. मात्र त्यांच्याच पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांच्याबाबत थेट वक्तव्य करणं टाळलं.
कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मुलांची भाजपशी जवळीक वाढली आहे. त्यामुळे पवारांनी राष्ट्रवादीचे माजी खासदार निवेदिता माने आणि माजी आमदार अशोक जांभळे यांची कानउघडणी केली.
निवेदिता माने यांचा मुलगा आणि जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील माने हे भाजपसोबत युती करण्यासाठी उत्सुक आहेत. तर जांभळे हे नुकत्याच झालेल्या इचलकरंजी नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप सोबत गेले होते.
धनंजय महाडिकांची भूमिका काय?
कोल्हापुरात राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक आणि काँग्रेस आमदार सतेज महाडिक यांचं हाडवैर राज्याला ठाऊक आहे.
धनंजय महाडिक यांची गेल्या काही दिवसांपासून भाजपशी जवळीक वाढली आहे. त्यांचा चुलतभाऊ अमल महाडिक हे भाजपचे आमदार आहेत, तर काका माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने त्यांना काँग्रेसने निलंबित केलं आहे.
अमल महाडिक यांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे विद्यमान विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील यांचा पराभव केला होता.
सतेज पाटील, काँग्रेस आमदार
सतेज पाटील (बंटी) आणि धनंजय महाडिक (मुन्ना) हे हाडवैरी असूनही, पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत महाडिकांना पाठिंबा दिला होता. मात्र धनंजय महाडिक यांनी विधानसभा निवडणुकीत धोकेबाजी केल्याचा आरोप सतेज पाटील यांचा होता. त्यामुळे जवळ आलेले बंटी-मुन्ना पुन्हा एकदा कट्टर शत्रू झाले.
त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात मी अलिप्त राहणार, आघाडीचा किंवा कोणता प्रचार करणार नाही, असं पत्रक खासदार धनंजय महाडिक यांनी प्रसिद्ध केलं आहे.
मात्र शरद पवार यांनी सध्या तरी महाडिक यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतल्याचं दिसत नाही.
मुश्रीफ-बंटी एकत्र
दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ हे काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र काँग्रेसशी म्हणजेच बंटी पाटील यांच्याशी आघाडी करण्यासाठी धनंजय महाडिकांचा विरोध आहे. त्यामुळे मुश्रीफांच्या निर्णयाशी महाडिकांनी फारकत घेतली आहे.
धनंजय महाडिकांचं पत्रक
महाडिक यांनी पत्रक प्रसिद्ध करुन, कोल्हापूर दक्षिण मतदार संघात आपण अलिप्त राहणार असल्याचं म्हटलं आहे. म्हणजेच या मतदारसंघात भाजप आमदार अमल महाडिक यांच्याविरोधात प्रचार न करण्याची भूमिका खासदार महाडिकांनी घेतली आहे.
धनंजय महाडिक यांनी पत्रकात म्हटलंय की, "कोल्हापूर दक्षिणमध्ये सर्वपक्षीयांची मोट बांधून राष्ट्रवादीचे उमेदवार घड्याळ चिन्हावर निवडून आणण्याचा प्रयत्न असेल असे विधान मी केले होते. त्यानंतर आ. मुश्रीफ यांनी काँग्रेसबरोबर आघाडी राहील, असे स्पष्ट केले आहे. आ. मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि सर्वेसर्वा असल्याने त्यांच्या भूमिकेचा मी आदर करतो. तथापि, कागल आणि राधानगरी-भुदरगड वगळता जिल्ह्यातील उर्वरित सर्व तालुक्यांत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपशी आघाडी केली आहे. आ. संध्यादेवी कुपेकर, माजी खासदार निवेदिता माने आणि मानसिंगराव गायकवाड यांनीसुद्धा भाजपशी आघाडी करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. मग कोल्हापूर दक्षिणबाबतच वेगळा निर्णय का?, याचे आश्चर्य वाटते, असेही पत्रकात म्हटले आहे.
संबंधित बातम्या
संजय निरुपम मूर्ख माणूस : शरद पवार
शरद पवार मोदी सरकारविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
महाराष्ट्र
नाशिक
Advertisement