Nana Patole on Maharashtra CM : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? नाना पटोलेंनी एका वाक्यात नाव सांगितलं!
महाविकास आघाडी म्हणून आमचा चेहरा आम्ही पुढे करु. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील भ्रष्ट भाजप महायुतीच्या सरकारला पराभूत करू, अशी भूमिका आम्ही आम्हा सगळ्यांची असल्याचे नाना पटोले यांनी सांगितलं.
Nana Patole on Maharashtra CM : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीनदिवसीय दिल्ली वारी केल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? याची चर्चा चांगलीच रंगली आहे. महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदासाठी कोणाला संधी दिली जाणार अशी चर्चा रंगली असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्याला चेहरा द्यावा लागेल असे म्हणतानाच मुख्यमंत्रीपदाचा निर्णय एकत्र बसून घेतला जाईल, घाई केली जाणार नाही असे तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी ठरवलं असल्याचे सांगितले.
महाविकास आघाडी हाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल
त्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी (Nana Patole on Maharashtra CM) सुद्धा मुख्यमंत्रीपदावरून सावध प्रतिक्रिया दिली आहे. पटोले यांनी मुख्यमंत्रीपदावरून बोलताना सांगितले की, महाविकास आघाडी म्हणून आमचा चेहरा आम्ही पुढे करु. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील भ्रष्ट भाजप महायुतीच्या सरकारला पराभूत करू, अशी भूमिका आम्ही आम्हा सगळ्यांची असल्याचे नाना पटोले यांनी सांगितलं. दरम्यान नाना पटोले यांना उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील का? याबाबत विचारले असता त्यांनी महाविकास आघाडी हाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल असे एका वाक्यात सांगत अधिक भाष्य करणे टाळलं.
अजितदादांच्या गुलाबी रंगावरून टीका
दरम्यान, महाराष्ट्रात कापसाची शेती केली जाते त्यालाही गुलाबी आळी येते. ही महाराष्ट्रात तिजोरी लागलेली गुलाबी आळी आहे. अशी खोचक टीका नाना पटोले यांनी केली. मला गुलाबी रंगांमध्ये बोलायचं नाही. मात्र, गुलाबी अळीचा प्रादुर्भाव असतो तो आहे असे नाना पटोले म्हणाले. ते पुढे म्हणाले की 270 कोटींचा खर्च प्रसिद्धीसाठी जनतेच्या घामाचा पैशातून महायुती सरकारकडून केला जात आहे. मात्र, त्याचा काहीच फायदा होणार नाही. जनतेच्या पैशाची उधळपट्टी करू नये ही भूमिका काँग्रेसची असल्याचे नाना पटोले म्हणाले. शरद पवारांनी त्यांच्या पक्षात काय निर्णय घ्यायचा त्यांचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षांमध्ये जे सोडून गेले त्यांच्याबद्दलची भूमिका काय आहे हे त्यांनी ठरवायचं असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्राचे उद्योग गुजरातमध्ये पाठवले आणि महाराष्ट्राच्या जनतेला बेरोजगारांच्या खाईमध्ये टाकलं. तरुणांचं आयुष्य बरबाद केलं. शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावली. अशा या अत्याचार आणि भ्रष्ट व्यवस्थेला कशी पीसिंग करायची आम्हाला माहीत असल्याचे ते म्हणाले. भ्रष्टाचारी व्यवस्था त्यांनी जमा करून ठेवली आहे. भ्रष्टाचाराचा वाक्य त्यांनी बोलावं आणि सुरुवात करावी. बाकी औषध आमच्याकडे असल्याचा इशारा त्यांनी दिला.
इतर महत्वाच्या बातम्या