Param Bir Singh : प्रवीण दरेकरांना अडकवण्यासाठी मातोश्रीवर, गिरीश महाजनांना अडकवण्यासाठी सिल्व्हर ओकवर बैठक : परमवीर सिंह
Param Bir Singh : परमवीर सिंग यांनी थेट मातोश्री आणि सिल्वर ओकचा उल्लेख करत या प्रकरणामध्ये अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचाही सहभाग असल्याचा आरोप केला.
Param Bir Singh : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह (Param Bir Singh) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर शंभर कोटी वसुलीचा केलेला आरोप खरा असल्याचे म्हटलं आहे. परमवीर सिंग यांनी आज (9 ऑगस्ट) अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख यांनी केलेल्या आरोपानंतर आज एबीपी माझाशी बोलताना देशमुखांवरील आरोपांचा पुनरुच्चार केला. सुशांत सिंह प्रकरणामध्ये बॉलिवूडवर दबाव टाकण्यात सांगण्यात आल्याचा आरोप सुद्धा सिंग यांनी केला. दरम्यान, परमवीर सिंग यांनी थेट मातोश्री आणि सिल्वर ओकचा उल्लेख करत या प्रकरणामध्ये अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचाही सहभाग असल्याचा आरोप केला. त्यामुळे या प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा आरोपांची मालिका होण्याची शक्यता आहे.
सूत्रधार अनिल देशमुख असले, तरी त्यांच्या मागे पवार-ठाकरे
परमवीर सिंग यांनी गुन्हे दाखल करणारे सूत्रधार अनिल देशमुख असले, तरी त्यांच्या मागे पवार-ठाकरे असल्याचा खळबळजनक आरोप केला. परमवीर सिंह यांनी सलील देशमुख (अनिल देशमुख यांचे चिरंजीव) हॉटेल ललितमध्ये बसून डील करत होते, असा आरोप केला. ते म्हणाले की पोलिसांच्या बदल्यांसाठी अनिल देशमुख यांनी शेरा मारलेली पत्र माझ्याकडे आहेत. महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये विरोधी नेत्यांना अडकवण्यासाठी दबाव आला होता असा सुद्धा आरोप परमवीर सिंह यांनी एबीपी माझाशी बोलताना केला. जयकुमार रावल यांनाही अडकवण्यासाठी बैठक घेण्यात आलाचा दावा परमवीर सिंह यांनी केला आहे.
प्रवीण दरेकर, गिरीश महाजनांना अडकवण्यासाठी बैठका
दरम्यान विरोधी नेत्यांमधील प्रवीण दरेकर यांना अडकवण्यासाठी मातोश्रीवर बैठक झाली होती, तर गिरीश महाजन यांना अडकवण्यासाठी सिल्वर ओकवर बैठक झाली होती असेही ते म्हणाले. दरम्यान, देशमुख सातत्याने वसुलीचे टार्गेट आहे असे सांगत होते असेही परमवीर सिंह यांनी म्हटलं आहे. दरम्यान देशमुख यांचा आपण आदर करतो. सलील देशमुख यांनी माझ्याबद्दल वापरलेल्या भाषेबद्दल किवं येत असल्याचे म्हटले आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असे त्यांनी सांगितले. मी कधी आजपर्यंत अशा भाषेचा वापर केलेला नाही किंवा कोणत्याही माध्यमांसमोर येऊन या प्रकरणांमध्ये व्यक्त झालेलो नाही. मात्र माझ्यावर आरोप झाल्यानंतर मी यासंदर्भात बोलत असल्याचे परमवीर सिंह यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या