एक्स्प्लोर

Jitesh Antapurkar: क्रॉस व्होटिंगचा वहीम, हायकमांडच्या रडारवर असलेल्या चव्हाणांच्या विश्वासू आमदाराने अखेर काँग्रेसचा हात सोडला, कोण आहेत अंतापूरकर?

Jitesh Antapurkar: काही दिवसांपासून जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) आणि काँग्रेसचे काही आमदार हायकमांडच्या रडारवर असल्याची चर्चा होती. त्यामध्ये जितेश अंतापूरकर यांचंही नाव होतं, कोण आहेत अंतापूरकर जाणून घ्या सविस्तर

Jitesh Antapurkar: विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीमध्ये क्रॉस व्होटिंग केल्याप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात असलेले काँग्रेसचे देगलूर विधानसभा मतदारसंघातील आमदार जितेश अंतापूरकर यांनी आपल्या पक्ष सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. ते आज भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) आणि काँग्रेसचे काही आमदार हायकमांडच्या रडारवर असल्याची चर्चा होती. विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाची काही मतं फुटली होती. या आमदारांची नेमकी नावं समोर आली नव्हती. मात्र, क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांमध्ये जितेश अंतापूरकर यांच्या नावाचा समावेश होता. जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) कधीही पक्षाची साथ सोडून महायुतीसोबत जातील, अशी चर्चा सातत्याने राजकीय वर्तुळात रंगली होती. आज जितेश अंतापुरकर (Jitesh Antapurkar) यांचा विधिमंडळाने राजीनामा स्वीकारत गॅजेट काढले आहे. आज संध्याकाळी अंतापुरकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

आज संध्याकाळी 7 च्या सुमारास भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे. क्रॉस वोटिंगचा आरोप अंतापूरकर यांच्यावर होता. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचे विश्वासू म्हणून जितेश अंतापूरकर यांची ओळख होती.

कोण आहे अंतापूरकर ? 

देगलूरचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) हे चिरंजीव आहेत. रावसाहेब अंतापूरकर यांचे 2022 साली कोरोनामध्ये निधन झाले त्यावेळी पोटनिवडणुकीत काँग्रेसने जितेश अंतापूरकर यांना मैदानात उतरवले. तर भाजपने शिवसेने सुभाष साबणे यांचा भाजप प्रवेश करून त्यांना उमेदवारी दिली. त्या पोटनिवडणूकित अंतापूरकर हे 40 हजाराचा मताधिक्याने विजय झाले होते. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केल्यानंतर अंतापूरकर हे चव्हाण सोबत दिसू लागले. आता झालेल्या निवडणुकीत सुद्धा अंतापूरकर (Jitesh Antapurkar) हे फार सक्रिय नव्हते. त्या संदर्भात सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तक्रार देखील केली होती.

जितेश अंतापूरकर यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, ते पदवीधर आहेत. हैदराबादच्या सेंट मेरी इंजिनिअरींग कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतलेली आहे. जितेश अंतापूरकर हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे जवळचे आणि कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. जेव्हा चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हापासून अंतापूरकर (Jitesh Antapurkar) देखील भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा सुरू होत्या.

 विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगचा आरोप

विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगचा आरोप झाल्यानंतर काही नेते चांगलेच चर्चेत आले होते, त्यामध्ये जितेश अंतापूरकर हे देखील होते. विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची काही मते फुटली होती. याबाबत काही नेत्यांवर संशय व्यक्त केला जात होता. त्यात अंतापूरकर यांच्या नावाचीही समावेश होता. क्रॉस व्होटिंग करणाऱ्यांनावर थेट कारवाई करणं अशक्य असल्याने त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न देण्याच्या चर्चा सुरू असतानाच अंतापूरकर (Jitesh Antapurkar) भाजपात जातील अशी चर्चा होती. आज ती चर्चा खरी ठरली आहे, आज संध्याकाळी फडणवीस, बावनकुळे आणि अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पुर्ण होणार आहे. 

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?

व्हिडीओ

Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report
Ajit Pawar : तोंडी परीक्षा, उमेदवारीची प्रतीक्षा, इच्छुकांवर प्रश्नांची सरबत्ती Special Report
Shivaji Park Sabha:शिवाजीपार्कसाठी रस्सीखेच,शिवाजी पार्क मैदानावर कुणाचा आवाज घुमणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Girish Mahajan: साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एकही अवाक्षर खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एक अवाक्षरही खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
Embed widget