एक्स्प्लोर

भरतीत 'एसईबीसी'साठी पर्यायच नाही, मराठा विद्यार्थ्यांना फायदा कधी?

मोठ्या प्रतिक्षेनंतर एमपीएससीने 342 जागांसाठी जाहिरात काढली. ही जाहिरात प्रकाशित होऊन पाच दिवस झाले आहेत. मात्र मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षणाच्या कोट्यातून फॉर्म भरण्याची व्यवस्थाच नाही. एमपीएससीच्या साईटवर अद्याप सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गासाठीची माहिती भरता येत नाही.

बीड : मेगा भरतीमध्ये मराठा आरक्षणाचा फायदा उमेदवारांना होणार असे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र नुकत्याच जाहिर झालेल्या 342 जागांसाठीच्या भरतीत एसईबीसीसाठी पर्यायच नसल्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षणाचा फायदा मिळणार कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 342 जागांसाठीच्या भरतीच्या जाहिरातीतील विविध पदांसाठी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी जी माहिती अपलोड करायची आहे, ती माहिती भरली जात नसल्याने मराठा समाजातील विद्यार्थी बुचकळ्यात पडले आहेत. मोठ्या प्रतिक्षेनंतर एमपीएससीने 342 जागांसाठी जाहिरात काढली. ही जाहिरात प्रकाशित होऊन पाच दिवस झाले आहेत. मात्र मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षणाच्या कोट्यातून फॉर्म भरण्याची व्यवस्थाच नाही. एमपीएससीच्या साईटवर अद्याप सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गासाठीची माहिती भरता येत नाही. 16 टक्के आरक्षण असतानाही आठ टक्केच फायदा नोकरी भरतीच्या जाहिरातीनंतर अनेक विद्यार्थी आता फॉर्म भरण्यासाठी गर्दी करत आहेत. मात्र त्यांच्या प्रत्येकाच्या प्रोफाईलमध्ये जात प्रवर्गामध्ये बदलच करता येत नसल्याने अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर या नोकरभरतीत पुन्हा निराशाच हाती येते की काय? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. तर दुसरीकडे जातीचा प्रवर्ग कसा बदलायचा याचीदेखील माहिती कुठेच उपलब्ध होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण असतानाही या जाहिरातीवर नजर टाकल्यावर आठ टक्के इतकाच फायदा मराठा समाजातील मुलांना होणार आहे असे दिसते. विद्यार्थ्यांच्या तक्रारी मात्र आयोगाकडून उत्तर नाही या भरतीचा फॉर्म भरण्यासाठी इतर समाजातील मुलांसाठी त्यांच्या वेगळ्या प्रवर्गाची सोय या साईटवर करण्यात आली आहे. मात्र मराठा समाजातील मुलांना अद्यापही या साईटवर आपला प्रवर्ग बदलता येत नाही. याची माहिती घेण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत. त्यांना ई-मेलही केले आहेत. मात्र आयोगाकडून कुठलंही उत्तर मिळत नसल्याचं समोर आलं आहे. मराठा आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर तब्बल दहा दिवसांनी मुलांना मराठा जातीचे प्रमाणपत्र शासनाकडून मिळू लागले आहे. विशेष म्हणजे एमपीएससीचा फॉर्म भरताना 2014 साठी ज्या मुलांना मराठा समाजाचा जातीचे प्रमाणपत्र मिळाले होते, तेसुद्धा चालणार आहे. मात्र भरतीची जाहिरात प्रसिद्ध होऊन आता पाच दिवसाचा कालावधी उलटला तरी फॉर्म कसा भरायचा? याची माहितीच उपलब्ध नसल्याने मराठा समाजातील विद्यार्थी चिंतेत आहेत. एमपीएससी भरतीत मराठा समाजासाठी राखीव जागा पद                                       एकूण जागा                  एसईबीसी उपजिल्हाधिकारी                               40                         04 पोलीस उप अधीक्षक                        34                         03 सहायक पोलीस आयुक्त सहायक संचालक                              16                         01 (वित्त व लेखा सेवा) तहसीलदार                                       77                         06 उप शिक्षणाधिकारी                           25                         02 (राज्य शिक्षण सेवा) कक्ष अधिकारी                                  16                         01 सहायक गट विकास अधिकारी         11                         01 नायब तहसीलदार                            113                       08
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget