एक्स्प्लोर
जेव्हा अजित पवार क्रोधीत होतात.. कार्यकर्त्यासोबतची ऑडिओ क्लिप वायरल
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता यांच्यातील फोनवरील संभाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये अजित पवार यांनी कार्यकर्त्याला चांगलचं सुनावलंय.
![जेव्हा अजित पवार क्रोधीत होतात.. कार्यकर्त्यासोबतची ऑडिओ क्लिप वायरल When Ajit Pawar gets angry, Audio clip with activist goes viral जेव्हा अजित पवार क्रोधीत होतात.. कार्यकर्त्यासोबतची ऑडिओ क्लिप वायरल](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/08/10003102/ajit-pawar.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
संग्रहित छायाचित्र
धुळे : उपमुख्यमंत्री तथा वित्त, नियोजन मंत्री अजित पवार हे शांत स्वभावी, सहसा चिडून न बोलणारे. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीने वेतन मिळण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला त्याच पद्धतीनं शिक्षकांचा पगाराचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला अजित पवारांनी चांगलेच सुनावले. या संदर्भातील ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर वायरल झालीय.
ज्यावेळी आपण शब्द दिला होता, त्यावेळी राज्यात कोरोना नव्हता, कोरोनामुळे राज्याचं वर्षाचं उत्पन्न साडेचार लाख कोटींवरून अडीच लाख कोटींवर आलंय, दोन लाख कोटी कमी झालेत. तुमचा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना देतो, बस्स झालं! असं म्हणत अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्याला सुनावलं. राष्ट्रवादीच्या या कार्यकर्त्याची बोलण्याची पद्धत कदाचित बरोबर नसावी म्हणून अजित पवार त्या कार्यकर्त्यावर चिडले असावेत, अशी चर्चा आहे. या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर वायरल झाली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे पावणे दोन महिन्याचे वेतन आज जमा होणार
एसटी कर्मचाऱ्यांचा थकीत वेतनाचा प्रश्न मार्गी
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या साधारण 1 लाख 10 हजार कर्मचाऱ्यांचा थकीत वेतनाचा प्रश्न सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन विभागाचे मंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गेल्या आठवड्यात मुंबईत बैठक होऊन एसटी कर्मचाऱ्यांचा थकीत वेतनाचा प्रश्न मार्गी लागला. एसटी कर्मचाऱ्यांनी अत्यावश्यक सेवेत देखील काम केलं. मात्र, असं असताना देखील त्यांची आर्थिक परवड होऊ लागली. या संदर्भात शासन दरबारी संघटनांनी, एसटी कर्मचाऱ्यांनी पाठपुरावा केला. माध्यमांनी देखील एसटी कर्मचाऱ्यांची व्यथा मांडली. या सर्वांची उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा दिलाय.
..अन् अजित पवार यांनी कार्यकर्त्याला सुनावलं
ज्या पद्धतीनं अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा पगाराचा प्रश्न मार्गी लावला, त्याच पद्धतीनं शिक्षकांच्या पगाराचा प्रश्न देखील मार्गी लावावा या समजुतीनं जालना येथील राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे उद्धव म्हस्के नामक कार्यकर्त्याने अजित पवारांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. मात्र, अजित पवार यांनी राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती काय हे विशद करून कार्यकर्त्याला सुनावलं. थोडक्यात काय तर त्यांना मदत केली म्हणून आम्हाला देखील मदत करा असा पवित्रा घेणं योग्य नाही, एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती, शिक्षकांची आर्थिक स्थिती याची तुलना होऊ शकत नाही, असा अप्रत्यक्ष संदेश उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यकर्त्याला दिला नाही ना? अशी देखील चर्चा आहे. शिक्षकांना देखील पगार मिळायला पाहिजे, या बाबत कुणाचं दुमत नाही. मात्र, त्यांना मदत केली म्हणून आम्हाला देखील मदत करा, असं म्हणणं योग्य नसल्याचा सूर एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलाय.
Corona Help | पिंपरी-चिंचवडच्या राष्ट्रवादी नगरसेवकाचं योगदान, वाढदिवसाचा खर्च टाळत 45 ऑक्सिजन सिलेंडरची मदत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
करमणूक
क्राईम
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)