एक्स्प्लोर

मेघगर्जनेसह पाऊस सुरु असल्यास काय काळजी घ्याल? घराबाहेर असल्यास काय कराल?

वीज कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होते यावर दक्षता महत्त्वाची आहे. वादळी वारा किंवा विजा चमकतात त्यावेळी घरात असल्यास घराच्या खिडक्या आणि घराचे दरवाजे बंद ठेवाव्यात.

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात दरवर्षी वीज पडल्याने अनेकांचा मृत्यू होतो. बहुतांश वेळी विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू असताना बरेच जण पावसापासून बचाव करण्यासाठी झाडांचा आसरा घेतात. अशावेळी नेमकी वीज झाडांवर कोसळल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. मागील 6 वर्षात नैसर्गिक वीज कोसळून जिल्ह्यात आजपर्यंत 101 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे .

पावसाळ्याच्या दिवसात शेती काम करताना अशा घटना बरेचदा होतात. यासाठी बचाव आणि सुरक्षा आणि गोष्टींचे पथ्य पाळले तर अशा घटना टाळता येऊ शकतात. यवतमाळ जिल्ह्यात मागील 6 वर्षात वीजपडून 101 लोकांचा मृत्यू झाला आहे  

  • 2014 : 22 मृत्यू 
  • 2015 : 06 मृत्यू
  • 2016 : 15 मृत्यू
  • 2017 : 30 मृत्यू
  • 2018 : 02 मृत्यू
  • 2019 : 11 मृत्यू
  • 2020 : 06 मृत्यू 

तर 1 एप्रिल 2021 ते 9 जून 2021 पर्यंत 9 व्यक्तीचा वीज पडल्याने मृत्यू झाला आहे.

वीज कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होते यावर दक्षता महत्त्वाची आहे. वादळी वारा किंवा विजा चमकतात त्यावेळी घरात असल्यास घराच्या खिडक्या आणि घराचे दरवाजे बंद ठेवाव्यात. तसेच घराच्या खिडक्यांच्या कुंपनंपासून दूर राहावे. मेघगर्जना झाल्यापासून 30 मिनिटे घराच्या आतच राहावे. आपण जर घराबाहेर असल्यास त्या वेळेस सुरक्षित निवाराच्या ठिकाणी मजबूत इमारतीकडे जाण्याचा प्रयत्न करावा. शिवाय ट्रॅक्टर, शेती अवजारे, मोटरसायकल, सायकल यांच्यापासून दूर राहावे. गाडी चालवत असल्यास सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करावा. उघड्यावर असल्यास शेवटचा पर्याय म्हणून लगेच गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व  डोके दोन्ही गुडघ्यांमध्ये झाकावे. जमिनीशी कमीत कमी संपर्क असावा 

मोकळ्या तसेच लटक्या विद्युत तारांपासून दूर राहावे. जंगलामध्ये उताराच्या जागेवर निवारा घ्याव्या. इतर खुल्या जागेवर दरी सारख्या खोल जागेवर जाण्याचा प्रयत्न करावा. आणि वीज पडल्यास वज्राघात झाल्यास त्वरित रुग्णवाहिका किंवा वैद्यकीय मदत बोलवावी. वज्राघात बाधित व्यक्तीस त्वरित वैद्यकीय मदत मिळवून द्यावी. त्याला हात लावण्यास धोका नाही. ओल्या व थंड परिस्थितीत बाधित व्यक्ती व जमिनीच्यामध्ये संरक्षणात्मक थर ठेवावा. जेणेकरून हायपोथॅर्मीया शरीराचे अति कमी तापमानचा धोका कमी होईल. शिवाय श्वसन बंद असल्यास तोंडावाटे पुनरुत्थान प्रक्रिया अवलंबावी. हृदयाचे ठोके बंद असल्यास कुठलाही वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रुग्णाच्या हृदयाची गती सीपीआर करून सुरू ठेवावी.

 विशेष म्हणजे गळगळातीचे वादळ असल्यास उंच जागांवर, टेकडीवर ,मोकळ्या जागेवर, समुद्रकिनारी, स्वतंत्र झाड, रेल्वे, बस, टॉवर्स, ध्वजाचे खांब, विद्युत दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, उघडी वाहने आणि पाणी इत्यादी टाळावे. घरात असल्यास वायरद्वारे जोडले गेलेले फोन मोबाईल, इलेक्ट्रिक उपकरणे विद्युत जोडणीस लावू नये. गडगडीच्या वादळादरम्यान वीज चमकताना कोणतेही विद्युत उपकरण वापर करू नये. यादरम्यान आंघोळ करणे, हात धुणे, भांडी घासणे, कपडे धुणे हे कार्य सुद्धा करू नये. अशी दक्षता घेतल्यास नक्कीच वीज कोसळून होणाऱ्या जीवितहानीच्या घटना आपण टाळू शकतो, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Embed widget