एक्स्प्लोर
स्मशानात विवाहसोहळा, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अनोखा प्रयत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या उपक्रमा अंतर्गत स्मशानात आंतरजातीय विवाह पार पडला.
बेळगाव : अंत्यसंस्कारासाठी स्मशानात नागरिक जमले होते. मृतदेह चितेवर ठेवून त्याला अग्नि देण्यात आला, त्याचवेळी दुसरीकडे अग्निभोवती सात फेरे घेऊन साताजन्माच्या सोबतीच्या आणाभाका घेण्यात आल्या. एखाद्या चित्रपटात शोभावा असा प्रसंग बेळगावच्या सदाशिवनगरमधील स्मशानभूमीत पार पडला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या उपक्रमा अंतर्गत स्मशानात आंतरजातीय विवाह पार पडला. मानव बंधुत्व संघटनेच्या माध्यमातून अंधश्रद्धा दूर करण्यासाठी म्हणून आमदार सतीश जारकिहोळी आणि मानव बंधुत्व संघटना यांच्या पुढाकाराने चक्क स्मशानात एक आंतरजातीय विवाह पार पडला.
सोपान बाळकृष्ण जांबोटी या मागासवर्गीय तरुणाचा आंतरजातीय विवाह हिरेबागेवाडीतील रेखा चंद्रप्पा गुरवण्णवर या लिंगायत समाजातील तरुणीशी पार पडला. विवाहाला उपस्थित मंडळींनी अक्षता टाकून वधूवरांना शुभेच्छा दिल्या.
आमदार सतीश जारकिहोळी यांनी नवदाम्पत्याला 50 हजार रुपये रोख आहेर देत त्यांचं अभिनंदन केलं. आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना सरकारने तीन लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं आमदार सतीश जारकिहोळी यांनी सांगितलं.
यापूर्वीही आमदार सतीश जारकिहोळी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्मशानात वास्तव्य करुन उपाहार आणि भोजन केलं होतं. स्मशानभूमीतील आंतरजातीय विवाह मात्र चर्चेचा विषय ठरला. माणसाचा अखेरचा प्रवास जिथे संपतो, तिथेच नवजीवनाचा प्रारंभ करण्याचं धाडस दाखवणाऱ्या वधूवरांचेही कौतुक करावे तितके थोडेच.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement