Weather Update: मुंबईसह मराठवाड्यात पुढील 24 तासांत पावसाचा जोर कमी होणार; आता धुळे, नंदुरबारसह नाशिकमध्ये जोरदार पावसाची शक्यता, परिस्थिती नेमकी कशी बदलली?
Weather Update: एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील पावसाचा जोर कमी होणार आहे. राज्यात असलेल्या डिप्रेशनचे अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात परिवर्तित झाले आहे त्यामुळे पावसाचा जोर ओसरणार आहे.

मुंबई: मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी (Heavy Rain) लावली आहे. शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे सहा जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत झाले. कर्नाटक, तेलंगणाकडे जाणारे मार्ग तसेच ग्रामीण भागातील अनेक रस्ते बंद पडले. नदी-नाले धोक्याच्या पातळीवरून वाहू लागले असून शनिवारी पाणी आणखी पसरले. गोदावरीसह हिंगोलीतील कयाधू, बीड, लातूर व धाराशिवमधील मांजरा नदीला पुन्हा पूर (Heavy Rain) आला. या पावसाळ्यात आतापर्यंत मराठवाड्यातील तब्बल २८५७ गावांतील शेती बाधित झाली आहे. आत्तापर्यंत ९० जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक भागांत मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला पाचारण करावे लागले. परंडा तालुक्यास पुन्हा पुराने झोडपले असून नांदेड आणि बीड शहरातील घरांबरोबर शाळा, अगदी पोलीस ठाण्यांपर्यंत पाणी घुसले. दरम्यान, काही जिल्ह्यातील शाळांना शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. अशातच आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील पावसाचा जोर कमी (Rain intensity will decrease) होणार आहे. राज्यात असलेल्या डिप्रेशनचे अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात परिवर्तित झाले आहे त्यामुळे पावसाचा जोर ओसरणार आहे.(Rain intensity will decrease)
Rain intensity will decrease: पुढील २४ तासांत पावसाचा आणखी कमजोर होणार
राज्यात असलेल्या डिप्रेशनचे अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात परिवर्तित झाले आहे त्याचबरोबर ते पुढील २४ तासांत आणखी कमजोर होणार आहे, अशात राज्यातील पावसाचा जोर कमी होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, कमी दाबाचे क्षेत्र २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान पश्चिमेकडे सरकत उत्तर महाराष्ट्र, दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्राच्या भागातून पुढे जाईल अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. १ ऑक्टोबरपर्यंत हे क्षेत्र गुजरात किनाऱ्याजवळ ईशान्य अरबी समुद्रात पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Rain intensity will decrease: धुळे, नंदुरबार आणि नाशिकमध्ये जोरदार पावसाची शक्यता
मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रातील वैज्ञानिक, सुषमा नायर यांनी माहिती देताना सांगितलं की, मुंबई, रायगड, पालघर आणि ठाण्यासाठी रेड अलर्ट आम्ही जारी केला आहे, डिप्रेशन परावर्तित झालंय आणि ते आत्ता अतीतीव्र कमी दाबाचे क्षेत्र झाले आहे. आत्ता ही सिस्टीम उत्तर महाराष्ट्रावर आहे. अशात, धुळे, नंदुरबार आणि नाशिकमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, आज देखील नाशिक आणि घाट माथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईवरील पावसाचा जोर उद्या कमी होईल. मराठवाड्यात पुढील २-३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता नाही, मात्र पूर परिस्थिती असल्याने अडचणींचा सामना होऊ शकतो, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

























