Weather Update:कोकणपट्टीसह पुणे, सातारा घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट, विदर्भ मराठवाड्यालाही पाऊस झोडपणार, वाचा IMD चा अंदाज
Maharashtra Weather Update: पुढील 24 तासात मुंबईसह उत्तर कोकण किनाऱ्यापासून पूर्वेकडील समुद्रावर कमी दाबाचा पट्टा आहे .

Maharashtra Weather Update: राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. कोकणपट्टीवर पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली असून येत्या तीन दिवसांत महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्रात 18 व 19 जून रोजी तीव्र पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. (IMD Weather Forecast)
विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पावसाची शक्यता आहे.आज मुंबईसह संपूर्ण कोकणपट्टीवर पावसाचे तीव्र अलर्ट देण्यात आले आहेत. आज( 18 जून) पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह सातारा व पुणे घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचे यलो अलर्ट आहेत.
हवामान विभागाचा अंदाज काय ?
दक्षिण व मध्य भारताचा बहुतांश भाग मान्सूनने व्यापला असून आज संपूर्ण गुजरात राजस्थानचा काही भाग , मध्य प्रदेश,संपूर्ण छत्तीसगड, झारखंड ,उत्तर प्रदेशचा काही भाग मान्सूनने व्यापला आहे. पुढील 24 तासात मुंबईसह उत्तर कोकण किनाऱ्यापासून पूर्वतर आणि पूर्वेकडील समुद्रावर कमी दाबाचा पट्टा आहे .त्यामुळे मुंबई ठाणे येथे 70 ते 130 मीमी पाऊस पडू शकतो अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे .प्रादेशिक हवामान केंद्रानुसार मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटसह मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे .यावेळी 40 ते 50 किमी प्रति वेगाने वारे वाहण्याचे शक्यता आहे .
Thundershower accompanied with lightening , light to moderate rainfall , gusty wind 40 -50 Kmph very likely to occur at a isolated places in the districts of Marathwada.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) June 18, 2025
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/Q3YJhkFTzD
पुढील 5 दिवस कुठल्या जिल्ह्याला कोणता अलर्ट ?
18 जूनः
ऑरेंज अलर्ट : पालघर ठाणे रायगड रत्नागिरी, पुणे व सातारा घाट परिसर
यलो अलर्ट : मुंबई,सिंधुदुर्ग,कोल्हापूर घाट माथा,नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, नंदुरबार ,धुळे, जळगाव, बुलढाणा,वाशिम, अकोला ,अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर ,भंडारा, गोंदिया, गडचिरोली
उर्वरित भागात पावसाचा अलर्ट नाही.मात्र हलक्या पावसाच्या सरींची शक्यता आहे.
19 जून :
ऑरेंज अलर्ट : रायगड, रत्नागिरी, पुणे सातारा घाटमाथ्यावर पावसाची शक्यता
यलो अलर्ट : छत्रपती संभाजीनगर,जालना, परभणी, हिंगोली ,नांदेड,व संपूर्ण विदर्भाला यलो अलर्ट
20 जून :
यलो अलर्ट :संपूर्ण विदर्भासह हिंगोली ,परभणी, नांदेड, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पुणे व सातारा घाटमाथ्यावरही पावसाची शक्यता आहे .
21 जून : संपूर्ण विदर्भाला यलो अलर्ट .ठाणे, रायगड ,रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पुणे व सातारा घाटमाथ्यावरही मुसळधार पावसाचा यलो अलर्ट आहे .
हेही वाचा:























