पुढील तीन-चार तासात राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्याला झोडपणार
Weather Update : पुढील तीन ते चार तासात राज्यातील विविध जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका बसण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
IMD Rain Alert : महाराष्ट्रात (Maharashtra) पुढील तीन ते चार तासात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील 48 तासांसाठी राज्यात विविध ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात मान्सून उंबरठ्यावर आहे. राज्यात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं असल्याने कधीही मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
पुढील तीन-चार तासात राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
आयएमडीच्या अंदाजानुसार, दक्षिण रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, पश्चिम सोलापूर, नगर आणि मराठवाड्यातील लगतच्या काही भागात येत्या तीन ते चार तासांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. यादरम्यान, सोसाट्याच्या वाऱ्यासह गडगडाटी वादळाची शक्यता आहे.
कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्याला झोडपणार
Possibilities of mod to intense thunderstorms ovr South #Raigad, #Rtn, #Sindhudurg, #Pune, #Kolhapur, #Satara,#Sangali, west #solapur, #Nagar & adj parts of #Marathwada in next 3,4 hrs at isol places,with lightning,Rains & gusty winds.Intense spell of RF possible at few places. pic.twitter.com/szeuZaCON6
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 5, 2024
मान्सूनची वाटचाल कशी सुरु आहे?
दरम्यान, नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या उर्वरित भागांमध्ये, कर्नाटकचा उर्वरित भाग, दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग, तेलंगणा आणि किनारपट्टीचा काही भाग, छत्तीसगड आणि ओडिशाचा काही भाग, पश्चिम बंगालच्या आणखी काही भागांमध्ये पुढे जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील 3-4 दिवसात या मार्गाने मान्सून पुढे सरकेल.
हवामान विभागाने काय म्हटलंय?
5th June, next 24 hrs wind rainfall guidance by IMD Model, indicates possibility rainfall over parts of Madhya Maharashtra, Marathwada and Konkan areas.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 5, 2024
pl chk for IMD updates pic.twitter.com/1gVkzFpx3i