एक्स्प्लोर

Girish Mahajan On Eknath Khadse: नोटाबंदीच्या काळात तुम्ही काय केलं ते सर्व मला माहीत आहे; गिरीश महाजनांचा खडसेंना इशारा

Girish Mahajan On Eknath Khadse: नोटाबंदीच्या काळात तुम्ही चलनी नोटा कशा बदलण्यात आल्यात, काय धंदे हे केले हे माहीत आहे, असा इशारा गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना दिला.

Girish Mahajan On Eknath Khadse: जळगाव दूध महासंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असून राज्याचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे  (Eknath Khadse)यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. कधीकाळी एकाच पक्षात असणाऱ्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून राजकारण चांगलेच तापले आहे. नोटाबंदीच्या काळात तुम्ही काय धंदे केले, हे मला बोलण्यास भाग पाडू नका, असा थेट इशारा गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना दिला आहे. 

एकनाथ खडसे यांचा मुलगा निखिल खडसे याची आत्महत्या झाली की खून झाला याचा तपास करावा लागेल असं खळबळजनक वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना लक्ष्य केले आहे. नोटबंदीच्या काळात तुम्ही काय केलं, कुठं आणि कोणत्या प्रकारे नोटा बदलल्या हे सर्व माहीत असल्याचा दावा महाजन यांनी केला. गिरीश महाजन यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

भाजप-शिंदे गटाचा जामनेर येथे जळगाव जिल्हा दूध संघाच्या प्रचारासाठीचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती होती. मेळाव्यातील भाषणात बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर जोरदार हल्लाबोल केला. गिरीश महाजन यांनी म्हटले की, एकनाथ खडसे माझ्यावर आरोप करतात. मात्र माझ्याकडे बोट दाखवताना चार बोटे त्यांच्याकडेच आहेत. नोट बंदीच्या काळात त्यांनी काय काय केलं कुठे कुठे आणि कशा कशा नोटा बदलल्या हे सर्व मला माहीत आहे. मात्र ते बोलायला लावू नका असा थेट इशारा महाजन यांनी खडसे यांना दिला. 

शिंद गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा दूध संघाची निवडणूक सर्व पक्षांनी एकत्र येऊन विरोध करावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. एकनाथ खडसे यांनीही त्यासाठी तयारी दर्शवली होती. मात्र, मंत्री गिरीश महाजन यांनी त्यास अप्रत्यक्षरीत्या नकार दर्शविला आहे. निवडणूक लढवा आणि ती जिंकून दाखवा असे थेट आव्हान मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना दिले आहे. यावेळी महाजन यांनी जिल्हा दूध संघावर आम्हाला संधी द्या असे आवाहन मेळाव्यातील उपस्थित नागरिकांना आवाहन केले.

दूध संघ आपल्या ताब्यात येण्यासाठी मतदार आपल्या बाजूने वळवण्यासाठी भाजप-शिंदे गट आणि  महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू आहेत. दूध संघ ताब्यात घेण्यासाठी खडसे आणि गिरीश महाजन यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असल्याचं पाहायला मिळत आहे.  या दोन्ही नेत्यांच्यामध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह सात आमदार हे एकनाथ खडसे यांच्या विरोधात उभे ठाकले असून एकनाथ खडसे हे एकटे पडल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, खडसे यांची सहकार क्षेत्रावरील पकड पाहता भाजप-शिंदे गटासाठीही लढाई सोपी नाही. एकूणच आजपर्यंत कोणत्याही दूध संघाची निवडणूक राजकीय आखाडा बनली नसेल अशी जळगाव दूध संघाची निवडणूक आखाडा बनली आहे. जळगाव दूध महासंघाची निवडणूक 10 डिसेंबर रोजी पडणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरेंच्या भाषणात मराठीचा मुद्दा, उद्धव ठाकरेंच्या भाषणात मात्र पराभवाचीच सल; विजयी मेळाव्यावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंच्या भाषणात मराठीचा मुद्दा, उद्धव ठाकरेंच्या भाषणात मात्र पराभवाचीच सल; विजयी मेळाव्यावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया
जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाचा पाहिजे, राज ठाकरे कडाडले, टाळ्या शिट्ट्यांची दाद; म्हणाले,गुजराती..
जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाचा पाहिजे, राज ठाकरे कडाडले, टाळ्या शिट्ट्यांची दाद; म्हणाले,गुजराती..
Uddhav Thackeray Speech Today: म महापालिकेचा नाही, तर महाराष्ट्राचा सुद्धा, आम्ही तो काबीज करू; मराठी एकीची वज्रमुठ आवळत उद्धव ठाकरेंची 'राज'साक्षीने विराट गर्जना
म महापालिकेचा नाही, तर महाराष्ट्राचा सुद्धा, आम्ही तो काबीज करू; मराठी एकीची वज्रमुठ आवळत उद्धव ठाकरेंची 'राज'साक्षीने विराट गर्जना
Video: राज ठाकरेंशेजारी आदित्य, तर उद्धव काकांजवळ अमित; सुप्रिया सुळेंनी बजावली आत्याबाईंची भूमिका
Video: राज ठाकरेंशेजारी आदित्य, तर उद्धव काकांजवळ अमित; सुप्रिया सुळेंनी बजावली आत्याबाईंची भूमिका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech : एकत्र राहण्यासाठी एकत्र आलोय, राज ठाकरेंसमोर UNCUT भाषण
Thackeray brothers unite | Uddhav आणि Raj Thackeray एकत्र, Marathi भाषेचा विजय!
Raj Thackeray Speech : फडणवीसांना जमलं, आम्हाला एकत्र आणलं, उद्धव ठाकरेंसमोर पहिलं भाषण
Thackeray Brothers Reunion | ठाकरे बंधू एकत्र, मराठीचा आवाज बुलंद!
Thackeray Reunion | ठाकरे बंधू दाखल, ठाकरे फॅमिली एकत्र; उत्कंठा शिगेला!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज ठाकरेंच्या भाषणात मराठीचा मुद्दा, उद्धव ठाकरेंच्या भाषणात मात्र पराभवाचीच सल; विजयी मेळाव्यावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंच्या भाषणात मराठीचा मुद्दा, उद्धव ठाकरेंच्या भाषणात मात्र पराभवाचीच सल; विजयी मेळाव्यावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया
जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाचा पाहिजे, राज ठाकरे कडाडले, टाळ्या शिट्ट्यांची दाद; म्हणाले,गुजराती..
जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाचा पाहिजे, राज ठाकरे कडाडले, टाळ्या शिट्ट्यांची दाद; म्हणाले,गुजराती..
Uddhav Thackeray Speech Today: म महापालिकेचा नाही, तर महाराष्ट्राचा सुद्धा, आम्ही तो काबीज करू; मराठी एकीची वज्रमुठ आवळत उद्धव ठाकरेंची 'राज'साक्षीने विराट गर्जना
म महापालिकेचा नाही, तर महाराष्ट्राचा सुद्धा, आम्ही तो काबीज करू; मराठी एकीची वज्रमुठ आवळत उद्धव ठाकरेंची 'राज'साक्षीने विराट गर्जना
Video: राज ठाकरेंशेजारी आदित्य, तर उद्धव काकांजवळ अमित; सुप्रिया सुळेंनी बजावली आत्याबाईंची भूमिका
Video: राज ठाकरेंशेजारी आदित्य, तर उद्धव काकांजवळ अमित; सुप्रिया सुळेंनी बजावली आत्याबाईंची भूमिका
Raj Thackeray : उद्धव ठाकरेंचं भाषण संपताच राज ठाकरे पुन्हा बोलायला उभे राहिले,  मराठी भाषेच्या लढ्यातील सहभागी पक्षांच्या नेत्यांना मंचावर बोलावलं अन्....
राज ठाकरेंनी समारोपापूर्वी एक गोष्ट सुधारली, महादेव जानकर ते दीपक पवार सर्वांना मंचावर बोलावलं अन्...
Raj Thackeray: सन्माननीय उद्धव ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवानो, 19 वर्षांनी एकत्र येत आहोत; राज ठाकरेंच्या भाषणानं सुरुवातीला स्फुरण संचारलं
सन्माननीय उद्धव ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवानो, 19 वर्षांनी एकत्र येत आहोत; राज ठाकरेंच्या भाषणानं सुरुवातीला स्फुरण संचारलं
Raj Thackeray:तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात, आमच्या कडे सत्ता आहे रस्त्यावर, राज ठाकरेंचा मराठीवरुन रोखठोक इशारा
तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात, आमच्या कडे सत्ता आहे रस्त्यावर, राज ठाकरेंचा रोखठोक इशारा
Uddhav Thackeray: राज ठाकरेंच्या तावडीतून सुटले, पण उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना पकडलंच, म्हणाले, 'गद्दार जय गुजरात बोलला'
राज ठाकरेंच्या तावडीतून सुटले, पण उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना पकडलंच, म्हणाले, 'गद्दार जय गुजरात बोलला'
Embed widget