एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लातूरकरांची तहान भागवण्यासाठीची पाण्याची रेल्वे मिरजेत दाखल
लातूर : पाणी टंचाईमुळे पिण्याच्या पाण्यासाठी तडफडणाऱ्या लातुरकरांची तहान भागवण्यासाठीची पाण्याची रेल्वे आज मिरजेत दाखल झाली आहे. वारणा धरण ते मिरज रेल्वे स्टेशन या दरम्यानची पाईपलाईन अद्याप तयार झाली नसल्यानं रेल्वेनं दुसऱ्या मार्गाची चाचपणी सुरु केली आहे.
आता त्याऐवजी रेल्वे जंक्शनमध्ये ज्या पाईपलाईनद्वारे पाणी येतं, तिथूनच पाणी नेण्याचा प्रयत्न सुरु आहे. हा प्रयत्न पूर्णत्वास नेऊन आजच लातूरसाठी रेल्वे रवाना करण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे.
आज सकाळी 50 वॅगन असलेली रेल्वे गाडी मिरजेत दाखल झाली. साधारण 10 वॅगन पाणी भरुन आज पहिली रेल्वे लातूरला रवाना होण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement