एक्स्प्लोर
जायकवाडी फुल्ल, तरीही औरंगाबादला तीन दिवसांआड पाणी
औरंगाबादला जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र धरण शंभर टक्के भरुनही औरंगाबादकरांना तीन ते चार दिवसांनी पाणी मिळत आहे.
औरंगाबाद : जायकवाडी धरणातून औरंगाबादला पाणीपुरवठा केला जातो. धरण 9 वर्षांनंतर शंभर टक्के भरलं आहे. मात्र तरीही औरंगाबादकरांना तीन दिवसांआडच पाणी मिळणार आहे. कारण शहरापर्यंत मुबलक पाणी पोहोचवण्याची कुठलीही यंत्रणा महापालिकेकडे नाही. त्यामुळे मुबलक पाणी असूनही औरंगाबादकरांना पावसाळ्यातच महापालिकेवर पाण्यासाठी मोर्चे काढावे लागत आहेत.
आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण काठोकाठ भरून वाहत आहे. नाथसागर नाव असलेलं हे जायकवाडी धरण मराठवाड्याची तहान भागवतं. मराठवाड्याची राजधानी औरंगाबादलाही इथूनच पाणी मिळतं. मात्र धरण शंभर टक्के भरुनही औरंगाबादकरांना तीन ते चार दिवसांनी पाणी मिळत आहे.
गेल्या 10 वर्षांपासून महापालिका निवडणुकीच्या जाहिरनाम्यात शहराला रोज पाणी देणार हा महत्त्वाची घोषणा असेल. मात्र आजही शहराला रोज पाणी मिळत नाही. रोज पाणी देण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून समांतर पाणी पुरवठा योजनेची नुसतीच चर्चा झाली. तीन वर्षांपूर्वी शहराला रोज पाणी पुरवाठा व्हावा, यासाठी संमातर पाणी पुरवठा योजना आखण्यात आली. त्याचं काम एका खासगी कंपनीला देण्यातही आलं. मात्र त्या कंपनीसोबत केलेला करार रद्द करण्याला आला. त्यामुळे शहराला आज मुबलक पाणी मिळत नसल्याचा आरोप शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला.
पाणी नाही, हा औरंगाबादचा प्रश्न नाही. मात्र पाणी असूनही ते शहरापर्यंत पोहोचवण्यासाठी व्यवस्था नसणं ही महापालिकेची खरी अडचण आहे. महापालिका यंत्रणा किती ढसाळ आहे, ते यावरुन दिसून येतं. विशेष म्हणजे दररोज पाणीपुरवठा का होत नाही, त्यात कोणत्या अडचणी आहेत, याचा कोणताही आढावा घेतला जात नाही, हे त्यापेक्षाही वाईट आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement