एक्स्प्लोर

Nashik News : नाशिकमध्ये पुन्हा पाणीबाणी! शनिवारी शहरात पाणीपुरवठा बंद, रविवारीही कमी दाबाने पाणीपुरवठा

Nashik News : नाशिक (Nashik) शहरातील महत्वाच्या ठिकाणी शनिवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

Nashik News : नाशिक (Nashik) शहरातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी असून उद्या शनिवारी शहरातील महत्वाच्या ठिकाणी पाणी पुरवठा (Water Cut) बंद करण्यात येणार आहे. नाशिक महावितरण कंपनीकडून उद्या वीज उपकेंद्र आणि मुख्य वीज वाहिन्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी महानगरपालिकेच्या गंगापूर (Gangapur Dam) आणि मुकणे धरणातील उपसा केंद्रांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे. शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असून रविवारी सकाळी कमी दाबाने, कमी प्रमाणात पाणीपुरवठा होईल, असे पाणीपुरवठा विभागाने म्हटले आहे.

नाशिक शहरात सध्या उन्हाची तीव्र झळ नाशिककरांना सोसावी लागत आहे. त्यामुळे पाण्याचा वापर अधिक होत असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर गंगापूर धरण साठ्यातही घट झाली असल्याने प्रशासनांकडून पाणी वापराचे नियोजन करण्यात येत आहे. अशातच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुकणे धरणाच्या पंपिंग स्टेशनवरील सब स्टेशनच्या विद्युत कामासाठी शनिवारी वीज पुरवठा बंद राहणार आहे. वीज पुरवठा बंद राहणार असल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम हाेण्याची शक्यता असते. त्यामुळे शनिवारी पाणीपूरवठा बंद (water supply) ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

दरम्यान नाशिक मनपाच्या मुकणे धरण रॉ वॉटर पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीचे रेमंड सबस्टेशन गोंदे येथून वीजपुरवठा घेण्यात आलेला आहे. सदरचे सबस्टेशन मधील विद्युत विषयक करण्यात येत आहेत. यासाठी विज वितरण कंपनीमार्फत शनिवारी वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मनपाचे विल्होळी जलशुध्दीकरण केंद्र येथून होणारा पाणीपुरवठा करता येणे शक्य होणार नाही. तसेच मनपाचे गंगापूर धरण पंपींग स्टेशन येथून मनपाचे शिवाजीनगर, बाराबंगला, पंचवटी, निलगीरीबाग, गांधीनगर, नाशिक रोड या जलशुध्दीकरण केंद्रास पाणीपुरवठा करण्यात येतो. सदरचे जलशुध्दीकरण केंद्र व जलकुंभ व वितरण व्यवस्थेतील आवश्यक दुरुस्तीची कामे करणे गरजेचे असल्याने गंगापूर धरण पंपींग स्टेशन येथून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे.

मनपाचे नागरिकांना आवाहन 

सबब सदर दोन्हीही ठिकाणाहून होणारा पाणीपुरवठा शनिवारी बंद ठेवून दुरुस्ती कामे करता येणे शक्य होणार आहे. तरी मनपाच्या गंगापुर धरण वॉटर पंपिंग स्टेशन आणि मुकणे धरण पंपींग स्टेशन येथून संपूर्ण शहरास होणारा शनिवार रोजीचा पाणीपुरवठा होणार नाही. तसेच रविवार रोजीचा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे अशी विनंती मनपाचे अधीक्षक अभियंता (यांत्रिकी) यांनी केली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा, पाण्याचा अपव्य टाळावा, पाणी जपून वापरावे, असे आवाहन मनपाकडून करण्यात आले आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Embed widget