Nashik News : नाशिककर! आजच पाणी भरून ठेवा, उद्या दिवसभर शहरात पाणी-बाणी
Nashik News : नाशिक (Nashik) शहरातील महत्वाच्या भागातील पाणी पुरवठा (water Cut) बंद राहणार आहे.
Nashik News : नाशिक (Nashik) शहरातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी असून शनिवारी शहरातील महत्वाच्या ठिकाणी पाणी पुरवठा (Water Cut) बंद करण्यात येणार आहे. महावितरण कंपनी शनिवारी वीज उपकेंद्र आणि मुख्य वीज वाहिन्यांची दुरुस्ती तसेच पावसाळापूर्व कामे असल्याने करणार या दिवशी महानगरपालिकेच्या गंगापूर 9Gangapur Dam) आणि मुकणे धरणातील उपसा केंद्रांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असून रविवारी सकाळी कमी दाबाने, कमी प्रमाणात पाणीपुरवठा होईल, असे पाणीपुरवठा विभागाने म्हटले आहे.
एकीकडं उन्हाची तीव्रता वाढली असून नाशिककरांची (Nashik City) लाहीलाही झाली असताना तहानही वाढली आहे. गंगापूर धरण सोमवारी शासनाने दिलेल्या माहितीनुसार 53 टक्क्यांवर आहे. आगामी काळात पाणी कपात होण्याची शक्यता असून अशातच मनपाच्या (Nashik NMC) गंगापूर धरण उपसा केंद्र येथे महावितरण कंपनीच्या सातपूर आणि महिंद्रा या दोन रोहित्रांवरून उच्च दाबाचा वीजपुरवठा घेण्यात आलेला आहे. या उपसा केंद्राद्वारे मनपाच्या बारा बंगला, शिवाजीनगर, पंचवटी, निलगिरी बाग, गांधीनगर व नाशिक रोड जलशुद्धीकरण केंद्र यांना पाणीपुरवठा केला जातो. महावितरण कंपनीच्या वतीने मुख्य वीज वाहिन्यांची दुरुस्ती व पावसाळापूर्व कामे (सातपूर कॉलनी ते कार्बन नाका ते गंगापूर धरण पर्यंत) करण्यासाठी वीजपुरवठा बंद ठेवला जाणार आहे.
नाशिक मनपाच्या मुकणे उपसा केंद्र येथे महावितरणच्या उपकेंद्रातील गोंदे येथून एक्स्प्रेस फिडरवरून जॅकवेलसाठी वीजपुरवठा आहे. महावितरण कंपनीच्या रेमण्ड उपकेंद्रात दुरुस्ती कामांसाठी वीजपुरवठा बंद राहणार आहे. महावितरणच्या दुरुस्ती कामामुळे गंगापूर व मुकणे धरणातून महानगरपालिकेला शनिवारी पाणी उचलता येणार नाही. त्यामुळे या दिवशी संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. रविवारी सकाळचा कमी दाबाने, कमी प्रमाणात पाणीपुरवठा होईल. नागरिकांनी याची नोंद घेऊन मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले.
पाणी कपातीची शक्यता
दरम्यान अल निनोमुळे जून व जुलै महिन्यात यंदा पाऊस कमी होण्याची शक्यता लक्षात घेत पालिकेने एप्रिल व मे महिन्यात आठवड्यातून एक दिवस तर पुढे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आढावा घेऊन जून व जुलै महिन्यात आठवड्यातून दोन वेळेस पाणी कपातीचे नियोजन केले आहे. मात्र या संदर्भात निर्णय कोणी घ्यायचा या सर्वात एप्रिल महिना निघून गेला आहे. दरम्यान शहराला प्रामुख्याने गंगापूर धरणात समूहातून पाणीपुरवठा होतो गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील 132 केवी सातपूर व महिंद्रा या दोन्ही फिडर वरून 33 केवी एचटी वीजपुरवठा घेण्यात आलेला आहे.
शहरातील या भागात पाणी पुरवठा बंद
नाशिक मनपाचे गंगापूर धरण पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील 132 केव्ही सातपूर व महिंद्रा या दोन फिडरवरुन 33 केव्ही एचटी वीज पुरवठा घेण्यात आलेला आहे. सदर पंपींग स्टेशनद्वारे मनपाचे बारा बंगला, शिवाजीनगर, पंचवटी, निलगिरी बाग, गांधीनगर व नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्र यांना रॉ वॉटरचा पुरवठा करण्यात येतो. महावितरण कंपनीकडून ओव्हरहेड लाईनची दुरुस्ती व पावसाळा पूर्व कामे (सातपूर कॉलनी ते कार्बन नाका ते गंगापूर धरण पावेतो) करण्याकरीता तसेच मनपाचे मुकणे रॉ वॉटर पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील रेमण्ड कार्यान्वित सबस्टेशन गोंदे येथून एक्सप्रेस फिडरवरुन जॅकवेलसाठी 33 केव्ही वीजपुरवठा आहे. सदरचे महावितरण कंपनीच्या रेमण्ड सबस्टेशनमध्ये महावितरण कंपनीस सबस्टेशन मधील दुरुस्ती कामे करणे करीता वीजपुरवठा बंद राहणार आहे. शनिवार रोजी संपूर्ण नाशिक शहराचा पाणी पुरवठा बंद राहील. तसेच दि. 30 एप्रिल रविवार रोजी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने कमी प्रमाणात होईल तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन मनपास सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.