वाशिममध्ये पोलीस पाटलाचा अल्पवयीन मुलावर गोळीबार, गुन्हा दाखल
ओमला जखमी अवस्थेत मुलाचा वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेप्रकरणी रिसोड पोलीस स्टेशनला तक्रारीनंतर पोलिसांनी कलम 324 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
वाशिम : पोलीस पाटलाने अल्पवयीन मुलावर गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील चाकोली येथील पोलीस पाटील गोविंद गरकळ यांनी एका 12 वर्षीय ओम गरकळ याच्यावर छऱ्याच्या बंदुकीची गोळी झाडून जखमी केल्याची घटना घडली आहे.
ओम गरकळ हा पोलीस पाटलाच्या त्यांच्या घर समोरून जात होता. दरम्यान पोलीस पाटील गोविंद गरकळ हा गावाजवळील शेतात वन्यजीव प्राण्यांना पळवण्यासाठी वापरल्या जाणारी बंदुकीतून गोळी मारत असताना ओमने पाहिले. त्यावेळी पोलीस पाटलाने प्राण्याऐवजी थेट ओमवरच गोळी झाडून त्याला जखमी केले. ओमच्या उजव्या दंडावर ही गोळी लागली असून ओम जखमी झाला आहे.
घटनेची गावात चर्चा होताच पोलीस पाटील गोविंद गरकळ याने बंदूक लगेच मोडून टाकली. 8 फेब्रुवारीला सायंकाळी ओमला जखमी अवस्थेत मुलाचा वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेप्रकरणी रिसोड पोलीस स्टेशनला तक्रारीनंतर पोलिसांनी कलम 324 नुसार गुन्हा दाखल केला आहे. ओम दंडात असलेली गोळी शस्त्रक्रिया करून बाहेर काढली जाणार आहे.