एक्स्प्लोर

संतापजनक...! रस्ता खराब असल्याचं कारण सांगत बाळंतिणीला बाळासह अर्ध्या रस्त्यात सोडलं! वाशिमची घटना

Washim News Latest Updates : वाशिममधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. रस्ता खराब असल्याचं कारण सांगत बाळंतीण महिलेला अर्ध्या रस्त्यात सोडले असल्याच्या घटनेनं संताप व्यक्त केला जात आहे.

Washim News Latest Updates : वाशिममधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. रस्ता खराब असल्याचं कारण सांगत बाळंतीण महिलेला अर्ध्या रस्त्यात सोडले असल्याच्या घटनेनं संताप व्यक्त केला जात आहे.  वाशिमच्या गणेशपूरची ही घटना आहे.  रस्ता खराब असल्याचं कारण सांगत रुग्णवाहिका चालकाने अवघ्या तीन दिवसाच्या बाळंतीण महिलेला लहान चिमुरड्यासह अर्ध्या रस्त्यात सोडलं. गणेशपूर गावात घडलेल्या घटनेमुळे आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. 

वाशिमच्या रिसोड तालुक्यातील गणेशपूर गाव रिसोडपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतर असलेल गाव. या गावातील महिला उषा सावंत या महिलेला प्रसूतीसाठी 24 तारखेला वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालय  इथं दाखल करण्यात आले. बाळंतपण नैसर्गिक पद्धतीने  झालं. त्यांना कन्यारत्न  प्राप्त झालं आणि 26 तारखेला डिस्चार्ज देखील मिळाला. त्यांना गावी सोडण्यासाठी सरकारी अॅम्बुलेंस देण्यात आली. मात्र या गावाला जोडणारा रस्ता खराब असल्याचं कारण सांगत 108/ 102 क्रमांकावरुन रुग्ण सेवेसाठी असलेल्या रुग्णवाहिकेच्या कंत्राटी चालकाने सदर महिला आणि तिच्या चिमुकलीसह त्यांच्या सहकारी असलेल्या महिलेला भर रस्त्यात खाली उतरवले आणि इथून पुढचा प्रवास तुम्ही करा असं सांगितलं.

मात्र शासन नियमानुसार प्रसूती झालेल्या महिलेला बाळासह त्यांच्या  घरी सोडण्याची जबाबदारी रुगवाहिकेच्या चालकाची आहे. याबाबत वेळोवेळी चालकाला सांगितले तसेच घरी सोडण्याची विनवणीही महिलेसह तिच्या सासऱ्यांनी केली. मात्र रस्ता खराब असल्याचं कारण सांगून चालकानं भर रस्त्यात त्यांना सोडून दिले. चालकाने तुमचे रस्ते खराब आहेत. तुम्ही आमदार, खासदार यांना बोला असं उत्तर दिल्याचा आरोप रुग्ण महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. 

त्यानंतर अर्धा किलोमीटर पायी चालल्यानंतर मागून येणाऱ्या एका वाहनाने महिलेला गावात नेऊन सोडले. या संतापजनक प्रकाराबद्दल वाशिमचे जिल्हा शल्य चिकित्सक डी बी खेडकर यांच्याशी ABP Majhaने संवाद साधला. त्यांनी सांगितलं की, घडलेला प्रकार निंदनीय असून त्या कंत्राटदार कंपनीला पत्रव्यवहार करून त्या चालकाला काढून टाकणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
Pune Mhada: पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaMajha Infra Vision Eknath Shinde :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मांडलं महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजनABP Majha Headlines : 09 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaABP Majha Headlines : 8 PM 09 Oct हेडलाईन्स एबीपी माझा ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
Pune Mhada: पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मोठी बातमी ! आचारसंहितेपूर्वी हालचाली; 15 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस
मोठी बातमी ! आचारसंहितेपूर्वी हालचाली; 15 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस
National Award : वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
Embed widget