एक्स्प्लोर
Advertisement
वर्ध्यात जादूटोणाच्या संशयातून विवस्त्र धिंड
वर्धा : वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यात अंधश्रद्धेपोटी माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य घडलं. जादूटोणा केल्याच्या संशयावरुन इसमाची विवस्त्र धिंड काढण्यात आली, तर एका महिलेला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी 7 जणांवर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्यांची रवानगी 15 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
महत्त्वाचं म्हणजे गिरड पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मंगरुळ गावात ही घटना घडली आहे.
अटकेत असलेल्या एका आरोपीच्या मुलीच्या अंगात येत असल्याचं म्हटलं जात होतं. महिनाभरापासून हा प्रकार सुरु होता. अंगात आल्यावर तिने गावातील एका महिलेचं आणि 66 वर्षीय देवराव तुराळे यांचं नाव घेतलं. त्यामुळे ह्या दोघांनी जादूटोणा केल्याचा संशय आल्याने गावकऱ्यांनी महिलेला मारहाण केली, तर देवराव तुराळे यांची विवस्त्र धिंड काढली.
या प्रकारानंतर देवराव तुराळे पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपींविरोधात जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली. दरम्यान, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी देवराव तुराळे यांनी केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement