Wardha News : गावात स्मशानभूमी नसल्याने गावकऱ्यांनी थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठलं; आवारातच मृतदेह दफन करण्याचा प्रयत्न
Wardha News : गावात स्मशानभूमी नसल्याने मृतदेह दफन कुठे करायचा? याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या संतप्त गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत ग्रामपंचायत आवारातच मृतदेह दफन करण्याचा प्रयत्न केलाय.
Wardha News वर्धा : गावात स्मशानभूमी नसल्याने मृतदेह दफन कुठे करायचा? याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या संतप्त गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यात गावकऱ्यांनी चक्क ग्राम पंचायतीच्या आवारातच मृतदेह दफन करायला आणतो म्हणत गड्डा खोदण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गावातील सरपंचाकडून पोलिसांना (Wardha Police) पाचारण करून गावकऱ्यांना समजविण्याचा प्रयत्न झालाय. मात्र, या निमित्ताने गावातील मूलभूत प्रश्न अद्याप मार्गी न लागल्याचे समोर आले आहे. रोठा येथे घडलेल्या या प्रकारामुळे गावातील गावकऱ्यांनी स्मशानभुमीच्या मागणीकडे नव्याने आज लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
ग्रामपंचायत आवारातच मृतदेह दफन करण्याचा प्रयत्न
वर्ध्याच्या नजीक असलेल्या रोठा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नागठाना येथे अद्याप स्मशानभूमि नसल्याने आयुष्याचा शेवटालाही यातना सहन कराव्या लागत असल्याचे चित्र आहे. अशातच गावकऱ्यांनी गेल्या पाच वर्षापासून स्मशानभूमीची मागणी केलीय. मात्र अद्याप या मागणीला घेऊन प्रशासनाकडून कुठलीही प्रक्रिया झालेली नाही. आज गावातीलच एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आधी ज्या शेतात अंत्यसंस्कार केले जात होते, त्या ठिकाणी शेतकऱ्याचा मालकी हक्क असल्याने अंत्यसंस्कार करण्याचा प्रश्न निर्माण झाला.
परिणामी गावकऱ्यांनी गेल्या पाच वर्षापासून स्मशानभूमी बांधण्याची मागणी केली पण ती पूर्ण झाली नसल्याने आणि पुढील अंतसंस्कार करायचा कुठे हा मोठा प्रश्न निर्माण झाला. ज्यांच्याकडे शेत आहे ते शेतात अंत्यसंस्कार करतात परंतु मोलमजुरी करणाऱ्यांनी, ज्यांच्या कडे सोय नसलेल्यांनी नेमके अंत्यसंस्कार करायचे कुठे? असा प्रश्न गावकऱ्यांनी ग्राम पंचायत प्रशासनाला विचारलाय. तर आज आपल्या मागणीला घेऊन संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठत याच आवारातच मृतदेह दफन करण्यासाठी खड्डा खोदण्याचा प्रयत्न केला.
पोलीस स्टेशन मधील दप्तरी विभागात लागली शॉर्ट सर्किटमुळे आग
गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस स्टेशन येथील दप्तरी विभागाला आज शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागल्याने विद्युत उपक्रम जळाले. सुदैवाने या आगीत कुठलेही महत्त्वाचे कागदपत्र जळाले नाही. मात्र लॅपटॉप, प्रिंटर, मॉनिटर, कीबोर्ड असे विद्युत उपकरण जळाले. त्यामुळे जवळपास एक ते दीड लाखाचे नुकसान झाले आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या समय सूचकतेमुळे महत्त्वाची कागदपत्र बाहेर काढण्यात आली. आगीत कुठलीही महत्त्वाचे कागदपत्र जळाली नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक अजय भुसारी यांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या