एक्स्प्लोर
Advertisement
ना थरांचं बंधन, ना उंचीची मर्यादा, वर्ध्यात डिजीटल दहीहंडी
वर्धा : सुप्रीम कोर्टाने दहीहंडीत थरांच्या आणि उंचीच्या मर्यादेचं बंधन घातल्यामुळे अनेक गोविंदा पथकांची अडचण झाली. मात्र वर्ध्यात पहिल्यांदाच आगळ्या वेगळ्या डिजीटल दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं.
आर्वीच्या गांधीचौक परिसरात दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. बालगोपाळांसह गृहिणींनी दहीहंडीत स्पर्धक म्हणून भाग घेतला. यासाठी त्यांना थर लावण्यासाठी उंचावर चढायचं नव्हतं, पडायची भीती नसल्यानं दीडशेच्यावर स्पर्धकांनी भाग घेतला.
सहा ते सात स्पर्धकांना ही डिजीटल दहीहंडी फोडण्याचा मान मिळाला आहे. ही दहीहंडी फोडण्याची संकल्पना थोडी वेगळीच होती. इथं ना पाण्याची नासाडी नव्हती ना काही, पण तरीही आनंद मात्र लहानग्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.
विशेष म्हणजे एका दिव्यांग मुलानेही या स्पर्धेत सहभागी होता. अनेकदा मोठ्या प्रमाणात स्पर्धक उंचावरुन पडून जखमी होतात, तर अनेकांना कायमचं अपंगत्व येतं. तर काहींना जीवाला मुकावं लागलं. यासाठी आगळा वेगळ्या पद्धतीनं दहीहांडीचं आयोजन केल्याचं मत आयोजकांनी व्यक्त केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement