एक्स्प्लोर
राज्याच्या राज्यपालपदी विक्षिप्त माणूस बसलाय : यशोमती ठाकूर
राज्याच्या राज्यपालपदी विक्षिप्त माणूस बसला आहे, अशी टीका महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केली आहे.
![राज्याच्या राज्यपालपदी विक्षिप्त माणूस बसलाय : यशोमती ठाकूर wacky man is a governor of Maharashtra, says Yashomati Thakur attack Governor Bhagat Singh Koshyari राज्याच्या राज्यपालपदी विक्षिप्त माणूस बसलाय : यशोमती ठाकूर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/05020123/Yashomati-Thakur_Bhagat-Singh-Koshyari.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सांगली : काँग्रेसच्या नेत्या आणि महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. सांगली जिल्ह्यात कृषी महाविद्यालय व्हावं अशी मागणी आहे. मात्र, राज्याच्या राज्यपालपदी एक विक्षिप्त माणूस बसला आहे, असं वक्तव्य यशोमती ठाकूर यांनी केलं आहे. सांगलीच्या जतमध्ये आमदार विक्रम सिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ठाकूर बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांची देखील उपस्थिती होती.
राज्याच्या राज्यपाल पदी बसलेल्या एका विक्षिप्त माणसामुळे अनेक अडचणी येत आहेत, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या. सांगली जिल्ह्यातील कृषी विद्यालयाच्या मागणीवरुन बोलताना मंत्री यशोमती ठाकूर यांनी काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत यांचा हवाला दिला. त्या म्हणाल्या की, "इथे कृषी कॉलेज सुरु झालं पाहिले अशी मागणी होती. दादांनी मला सांगितलं आहे, एक विक्षिप्त असा माणूस राज्याच्या गव्हर्नरपदी बसला आहे. मीडियावाल्यांना दाखवायचं असेल दाखवू शकतात.
पण आपण संविधानाने जोडले गेलो आहोत आणि संविधानावर प्रश्न निर्माण करुन मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारणारा माणूस राज्यपाल म्हणून बसला आहे. अडथळे ते आणत आहेत म्हणून या कृषी विद्यालये होत नाहीत ही वास्तविकता आहे, असा आरोपही यशोमती ठाकूर यांनी यावेळी भगतसिंग कोश्यारी यांच्यावर केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)