एक्स्प्लोर
चारऐवजी तीनच बटणं दाबली, मतदाराच्या कारनाम्यामुळे निवडणुकीचा खोळंबा
सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या निवडणूकीवेळी एका मतदाराच्या घाईमुळे इतर मतदारांना तातकळत थांबावं लागलं. घाईगडबडीत या मतदाराने चार बटणं दाबण्याऐवजी तीनच बटणं दाबल्यानं मिरजेतल्या एका मतदान केंद्रामध्ये मतदान प्रक्रियाच बंद पडली.
सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या निवडणूकीवेळी एका मतदाराच्या घाईमुळे इतर मतदारांना तातकळत थांबावं लागलं. घाईगडबडीत या मतदाराने चार बटणं दाबण्याऐवजी तीनच बटणं दाबल्यानं मिरजेतल्या एका मतदान केंद्रामध्ये मतदान प्रक्रियाच बंद पडली.
मिरजेतील राजेंद्र खामकरांच्या एका छोट्याश्या चुकीमुळे अनेक मतदारांचा खोळंबा झाला. मोठ्या भावाच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी जाणाऱ्या राजेंद्र खामकरने केलेल्या चुकीने मतदार तातकळत राहिले.
महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेवेळी चार बटणं दाबावी लागतात. जोपर्यंत चारही बटणे दाबली जात नाहीत, तोवर मतदानप्रक्रिया पूर्ण होत नाही. त्यामुळे राजेंद्र यांच्या या कारनाम्याने मतदान प्रक्रियाच खोळंबली.
राजेंद्रला परत बोलावून आणून 15 मिनिटांनी चौथ्या ठिकाणी मतदान करुन घेण्यात आली. मिरजेतल्या प्रभाग क्रमांक चारच्या आयडीएल इंग्लिश स्कूलमध्ये हा प्रकार सकाळी आज बुधवारी सकाळी 8.30 ते 9 च्या सुमारास प्रकार घडला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement