एक्स्प्लोर

Vivek Gurav Pune Plogger: जगात भारी पुणेकर! नदीपात्र ते थेट लंडनचा कचरा साफ करणाऱ्या पुणेकराला इंग्लंडच्या पंतप्रधानांकडून सर्वोच्च पुरस्कार जाहीर

कचरा हा कचरा असतो ज्यामुळे पर्यावरण समतोल बिघडू शकतं त्यामुळे भारतातील कचरा उचलणं आणि लंडनमधील कचरा उचलणं माझ्यासाठी सारखं आहे, असं विवेकने एबीपी माझ्याशी बोलताना सांगितलं. 

Vivek Gurav Pune Plogger: पुण्यातील विविध परिसरात असलेला कचरा पाहून पुण्यातील विवेक गुरव या तरुणाने 2019 मध्ये पुणे प्लॉगरची संकल्पना राबवली. त्यानंतर पर्यावरण संवर्धन आणि बदलते हवामान या विषयाचा अभ्यास करण्यासाठी त्याने लंडनमधील ब्रिस्टल विद्यापीठात प्रवेश घेतला. त्याच्या  प्लाॅगिंगच्या संकल्पनेला युनायटेड किंगडमच्या पंतप्रधानांकडून देण्यात येणाऱ्या 'पॉईंट ऑफ लाईट' हा पुरस्कार जाहीर झाला आहे. जे लोक त्यांच्या समुदायात बदल घडवत आहेत त्यांना 'पॉइंट्स ऑफ लाइट' पुरस्कार दिला जातो. उत्कृष्ट वैयक्तिक स्वयंसेवकांना हा पुरस्कार मिळतो. प्लॉगरच्या संकल्पनेमुळे विवेक गुरव याने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. युनायटेड किंगडमच्या भारतीय राजदूतांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

जयसिंगपूर येथील विवेक गुरव हा युवा तरुण युनायटेड किंग्डम  (UK) येथील ब्रिस्टल विद्यापीठाचा विद्यार्थी आणि पर्यावरणवादी आहे. पुण्यातील MIT अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्याने कम्प्यूटर इंजिनीअरींगचं शिक्षण पुर्ण केलं. त्यानंतर तो काही वर्ष IT मध्ये नोकरी करत होता. मात्र पुणे शहरातील विविध भागात फिरताना त्याला परिसरातील कचरा खुणावू लागला. कचरा साफ करणं फक्त पालिकेची जबाबदारी नसून सामान्य नागरिकांचीदेखील आहे हे समल्यावर त्याने 2019 मध्ये पुणे प्लॉगिंग नावाची संकल्पना राबवली. या उपक्रमात प्रत्येक शनिवार-रविवारी अनेक तरुणांना एकत्र आणत सकाळी फिरत, गाणे म्हणत आणि मजा करत कचरा गोळा करायला सुरुवात केली. दिवसभरात आपण किती कचरा करतो? याचा अंदाज घेतला. त्यानंतर या उपक्रमासाठी येणाऱ्या तरुणांची संख्या वाढत होती आणि शहरदेखील स्वच्छ होत होतं. 

Congratulations to @vcgurav on winning the @PointsofLight Award for his efforts to make Bristol city litter-free.

Vivek has brought his 'plogging' initiative from @PunePloggers to Bristol and is inspiring the community to take action on #ClimageChange. https://t.co/ao9ZNeypV4 pic.twitter.com/k2Cy3B0tl1

— UK in Mumbai 🇬🇧🇮🇳 (@UKinMumbai) July 19, 2022

">

स्विडन देशातील संकल्पना 

स्विडन देशात ही संकल्पना मोठ्या प्रमाणात राबवली जाते. या देशातील ही संकल्पना पुण्यात राबवून लाडकं पुणं स्वच्छ करु शकतो, असं त्याला सुचलं आणि त्याने मित्रमंडळींना सोबत घेत या उपक्रमाला सुरुवात केली. पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण प्रत्येक भारतीय करताना दिसतात. मात्र पाश्चात्य देशात असे चांगले उपक्रम आहेत, याची कल्पना अनेकांना नसते. सध्याचे तरुण अनेक सामाजिक प्रश्नांवर उपाय शोधण्याचं काम करत आहेत त्यातलाच एक हा विवेक गुरव आहे. भारतात अनेक शहरात आता नागरिक प्लॉगिंग करत स्वच्छता राखतात.

पुण्यातील नदीपात्र ते ब्रिस्टल विद्यापीठाचा विद्यार्थी

या सगळ्या उपक्रमावर काम करताना विवेकला पर्यावरण विषयात रुची वाढायला लागली. त्याने देशाबाहेर पर्यावरणाबाबतच्या शिक्षणाचा शोध सुरु केला. त्यावेळी त्याला लंडनमधील ब्रिस्टल विद्यापीठात प्रवेश मिळाला. या विद्यापीठात क्लायमेट चेन्ज आणि इन्व्हारलमेन्टल मॅनेजमेंटच्या कोर्सला त्याने प्रवेश घेतला त्यासाठी विद्यापीठाकडून त्याला 26 लाखांची शिष्यवृत्ती मिळाली होती. विकसित देश त्यांच्या पर्यावरणाचं संतुलन कशा पद्धतीने राखत आहेत आणि भारत कुठे कमी पडत आहे, याच्या अभ्यासाला त्याने  सुरुवात केली. 

Vivek Gurav Pune Plogger: जगात भारी पुणेकर! नदीपात्र ते थेट लंडनचा कचरा साफ करणाऱ्या पुणेकराला इंग्लंडच्या पंतप्रधानांकडून सर्वोच्च पुरस्कार जाहीर

लंडनमध्येही लोक कचरा करतात

भारतातून बाहेर देशात गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला तो देश स्वच्छ आणि सुंदर दिसतो. मात्र ब्रिस्टल गावात गेल्यावर भारतीयांसारख्याच सवयी सगळ्या जगात आहेत याची जाणीव झाली. त्यामुळे पुणे प्लॉगिंगचा उपक्रम त्याने  ब्रिस्टल शहरात सुरु करण्याचा निर्धार केला. अनेकांशी संपर्क केला. स्वत:च्या विदेशी मित्रांना सोबत घेत त्याने सुट्टीच्या दिवशी शहर साफ करायला सुरुवात केली. त्याचा हा उपक्रम शहरातील अनेक तरुणांना आवडला आणि तरुणांसोबतच शहरवासीय लोकांनीही यात सहभाग घेतला. कचरा हा कचरा असतो ज्याने पर्यावरण समतोल बिघडू शकतं त्यामुळे भारतातील कचरा उचलणं आणि लंडनमधील कचरा उचलणं माझ्यासाठी सारखं आहे, असं विवेकने एबीपी माझ्याशी बोलताना सांगितलं. 

प्लॉगिंग म्हणजे काय? 
आपल्यातील अनेक लोक मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडतात. मॉर्निंग वॉक करताना कचरा गोळा करत शहर स्वच्छ करण्याचं काम करणे, यालाच प्लॉगिंग म्हणतात.

अमेरिकेनंतर युकेमध्ये पुरस्काराला सुरुवात
'पॉईंट ऑफ लाईट' ची सुरुवात अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचा कार्यकाळात झाली होती.  आतापर्यंत 6,000 अमेरिकन अमेरिकन लोकांना 'पॉईंट ऑफ लाईट'  पुरस्कार देण्यात आला आहे. या योजनेला सर्व अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी मान्यता दिली आहे. त्यानंतर  यूकेच्या पंतप्रधानांनी 2014 पासून 'पॉईंट ऑफ लाईट' या पुरस्काराने सन्मान करण्यात येत आहे. आतापर्यंत अंदाजे 1969 लोकांना पुरस्कार देण्यात आला आहे.

शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shubhanshu Shukla :  कॅप्टन शुभांशू शुक्ला यांना अशोक चक्र जाहीर, आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रातील कामगिरीचा सन्मान  
शुभांशू शुक्ला यांना अशोक चक्र जाहीर,आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रातील कामगिरीचा सन्मान  
कोटक सिक्युरिटीजमध्ये ग्लिच आला अन् ट्रेडर कोट्यधीश बनला, 20 मिनिटात पावणे दोन कोटींची कमाई, प्रकरण न्यायालयात पोहोचलं
कोटक सिक्युरिटीजमध्ये ग्लिच आला अन् ट्रेडर कोट्यधीश बनला, 20 मिनिटात 1.75 कोटींची कमाई
दुर्गभ भागातील पोलिसांच्या धाडसाचा सन्मान; देशातील 121 पैकी 31 शौर्य पदके एकट्या गडचिरोलीत
दुर्गभ भागातील पोलिसांच्या धाडसाचा सन्मान; देशातील 121 पैकी 31 शौर्य पदके एकट्या गडचिरोलीत
मुंबईत 81 वर्षांपूर्वी महाभायनक आग आटोक्यात आणणारे अग्निशमन वाहन; BMC कडून ‘टर्न टेबल शिडी’चे पुनर्जतन
मुंबईत 81 वर्षांपूर्वी महाभायनक आग आटोक्यात आणणारे अग्निशमन वाहन; BMC कडून ‘टर्न टेबल शिडी’चे पुनर्जतन

व्हिडीओ

Mumbai Crime Special Report : लोकलमधील वादानंतर प्राध्यापकाची हत्या, CCTV च्या आधारे आरोपीला बेड्या
Mumbai Local Crimeलोकलमधून उतरताना धक्का लागल्याच्या रागातून रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्राध्यापकाची हत्या
Padma Awards 2026 : अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार
Bhiwandi Banner News : भिवंडीत वेगळ्या समीकरणाची नांदी? सेनेच्या बॅनरवर शरद पवारांच्या खासदाराचा फोटो
मोठी बातमी: मालाड रेल्वे स्थानकात पोटात चाकू भोसकून प्राध्यापकाला संपवणारा ओंकार शिंदे सापडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shubhanshu Shukla :  कॅप्टन शुभांशू शुक्ला यांना अशोक चक्र जाहीर, आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रातील कामगिरीचा सन्मान  
शुभांशू शुक्ला यांना अशोक चक्र जाहीर,आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रातील कामगिरीचा सन्मान  
कोटक सिक्युरिटीजमध्ये ग्लिच आला अन् ट्रेडर कोट्यधीश बनला, 20 मिनिटात पावणे दोन कोटींची कमाई, प्रकरण न्यायालयात पोहोचलं
कोटक सिक्युरिटीजमध्ये ग्लिच आला अन् ट्रेडर कोट्यधीश बनला, 20 मिनिटात 1.75 कोटींची कमाई
दुर्गभ भागातील पोलिसांच्या धाडसाचा सन्मान; देशातील 121 पैकी 31 शौर्य पदके एकट्या गडचिरोलीत
दुर्गभ भागातील पोलिसांच्या धाडसाचा सन्मान; देशातील 121 पैकी 31 शौर्य पदके एकट्या गडचिरोलीत
मुंबईत 81 वर्षांपूर्वी महाभायनक आग आटोक्यात आणणारे अग्निशमन वाहन; BMC कडून ‘टर्न टेबल शिडी’चे पुनर्जतन
मुंबईत 81 वर्षांपूर्वी महाभायनक आग आटोक्यात आणणारे अग्निशमन वाहन; BMC कडून ‘टर्न टेबल शिडी’चे पुनर्जतन
'धुरंदर' चित्रपटातील अभिनेत्याला अटक; घरकाम करणाऱ्या महिलेचं 10 वर्षे लैंगिक शोषण, गुन्हा दाखल
'धुरंदर' चित्रपटातील अभिनेत्याला अटक; घरकाम करणाऱ्या महिलेचं 10 वर्षे लैंगिक शोषण, गुन्हा दाखल
जळगावात भीषण अपघातात आजोबासह नातवाचा मृत्यू, आजी गंभीर जखमी; कुटुंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश
जळगावात भीषण अपघातात आजोबासह नातवाचा मृत्यू, आजी गंभीर जखमी; कुटुंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जानेवारी 2025 | रविवार
तामिळनाडूत हिंदीला स्थान नाही, आम्ही नेहमीच सक्तीला विरोध करू, तामिळवरील आमचं प्रेम कधीच मरणार नाही; सीएम स्टॅलिन यांचा एल्गार
तामिळनाडूत हिंदीला स्थान नाही, आम्ही नेहमीच सक्तीला विरोध करू, तामिळवरील आमचं प्रेम कधीच मरणार नाही; सीएम स्टॅलिन यांचा एल्गार
Embed widget