एक्स्प्लोर

वायरल चेक : कोण आहे हा पोलीस कर्मचारी?

आपल्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या आपल्या पोलीस बांधवाच्या पाठीत लाथ घातल्याचा हा फोटो... अवघ्या देशात वायरल झाला आणि अनेक जणांच्या तळपायाची आग मस्तकात गेली.

हिंगोली : राज्यात मराठा समाजाचं आरक्षण सुरु असताना एक फोटो व्हायरल होत आहे. प्रचंड संताप आणणारा हा फोटो... आपल्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या आपल्या पोलीस बांधवाच्या पाठीत लाथ घातल्याचा हा फोटो... अवघ्या देशात वायरल झाला आणि अनेक जणांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. मराठा आंदोलनात घुसलेल्या काही समाजकंटकांनी हे कृत्य केल्याचा दावा केला जाऊ लागला. पण कालांतराने हा फोटो मराठा आंदोलनातला नसल्याचाही दावा करणाऱ्या पोस्ट वायरल झाल्या. पण या फोटोचं सत्य काय? खरंच हा मराठा आंदोलनादरम्यानचा आहे...? की कुणी आंदोलनाला बदनाम करण्यासाठी खोडसाळपणा केला आहे? याचाच शोध आम्ही घेतला. हा फोटो हिंगोलीतल्या डोंगरकड्याचा असल्याची प्राथमिक माहिती आमच्या रिपोर्टरला कळली. आम्ही तात्काळ डोंकरकड्यात दाखल झालो आणि समोर आलं... या फोटोमागचं सत्य... तारीख 24 जुलै... नांदेड-नागपूर महामार्गावर असलेल्या डोंगरकडामध्ये मराठा आंदोलन सुरु होतं... शेकडो आंदोलकांनी महामार्ग रोखला होता... बाळापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी बंदोबस्ताला होते. त्याचवेळी काही आंदोलकांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. बंदोबस्ताला असलेले सतीश मोडक हे मध्यस्थीसाठी गेले. तेव्हाच एका अज्ञाताने त्यांच्या पाठीत लाथ घातल्याचा दावा त्यांनी केला. सतीश यांनी संयम दाखवत आंदोलकांना रस्त्यावरून हटवलं. पण त्याचवेळी त्यांच्या एका सहकाऱ्याने पाठीत बुटाचा शिक्का उमटलेला फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढला... फोटो संध्याकाळी पोलिसांच्या ग्रुपवर पोस्ट केला आणि तिथून तो अवघ्या महाराष्ट्रात वायरल झाला. त्यामुळे एबीपी माझाच्या पडताळणीमध्ये वायरल झालेला हा फोटो खरा ठरला आहे. व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
विधानसभेची खडाजंगी: राखीव मोहोळ मतदारसंघात कुणाचं पारडं जड?; विधानसभेला कोण उधळणार गुलाल
विधानसभेची खडाजंगी: राखीव मोहोळ मतदारसंघात कुणाचं पारडं जड?; विधानसभेला कोण उधळणार गुलाल
Embed widget