एक्स्प्लोर
Advertisement
मुख्यमंत्र्यांचा मराठा मोर्चात फूट पाडण्याचा प्रयत्नः विखे पाटील
शिर्डीः राज्यभरात निघणाऱ्या मराठ्यांच्या मोर्चांना जाहीर पाठिंबा आहे. अहमदनगरच्या मोर्चात आपण स्वतः सहभागी होणार आहोत, अशा शब्दात विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठ्यांच्या मोर्चांना पाठिंबा दर्शवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल घेतलेल्या मराठा नेत्यांच्या बैठकीवरही विखे पाटलांनी टीका केली आहे.
प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य योग्य- विखे पाटील
मराठा समाजाची भूमिका योग्य आहे. मात्र मुख्यमंत्र्यांकडून बैठका घेऊन आंदोलनात फूट पाडण्याचं राजकारण केलं जात असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं. “मराठा समाजाविरोधात दलितांनी प्रतिमोर्चे काढू नयेत. प्रतिमोर्चे काढणे दलितांच्या हितासाठी नव्हे, असे मोर्चे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हस्तक होतील. मराठा मोर्चा दलितविरोधी असल्याचा प्रचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सुरु आहे”, असं म्हणत भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संघावर निशाणा साधला होता.
सरकारवर टीका
अन्य समाजाला पुढे करुन काही जणांकडून राजकारण करण्याचा प्रयत्न होत आहे, अशा शब्दात विखे पाटलांनी सरकारवर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांनी काल राज्यभरातील मराठा नेत्यांची बैठक बोलावली होती. त्याचा विखे पाटलांनी समाचार घेतला.
मराठा समाजाच्या वतीने कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी व्हावी यासाठी विविध ठिकाणी मोर्चे काढले जात आहेत. आतापर्यंत औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, परभणी या ठिकाणी मोर्चे काढले आहेत. येत्या काळात पुणे, सातारा, सोलापूरसह अन्य ठिकाणी मोर्चे काढण्यात येणार आहेत.
संबंधित बातम्याः
मराठा मोर्चा दलितविरोधी असल्याचा प्रचार संघाचा: आंबेडकर
मराठा मोर्चे हे दलितविरोधी नाहीत : विनायक मेटे
मराठा मोर्चांनंतर 'वर्षा'वर हालचाली, मराठा नेत्यांची बैठक बोलावली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement