एक्स्प्लोर

बिहार निवडणूक निकाल 2025

(Source:  ECI | ABP NEWS)

निवडणुकांमध्ये मूळ ओबीसीला फटका बसणार, ज्या मराठ्यांना प्रमाणपत्र मिळाले ते सगळ्या जागा घेऊन जाणार : वडेट्टीवार 

निवडणुकांमध्ये मूळ ओबीसीला फटका बसणार आहे, त्यांचा माणूस स्थानिक निवडणुकांमध्ये दिसणार नाही असे वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

Vijay Wadettiwar : निवडणुकांमध्ये मूळ ओबीसीला फटका बसणार आहे, त्यांचा माणूस स्थानिक निवडणुकांमध्ये दिसणार नाही. याचं काम बळी तो कांन पिळी असे होणार असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले. समाज मोठा आहे, मात्र ओबीसीमधून ज्या मराठ्यांनी प्रमाणपत्र मिळवले आहे ते सगळ्या जागा घेऊन जातील. ओबीसीतील नेत्यांच्या निवडणुकांचे आरक्षण संपेल आहे. आम्ही ते आकडेवारीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकानंतर दाखवून देऊ. यापासून जे लोक दोन तारखेच्या जीआरमुळे नुकसान होत नाही असं म्हणत आहेत. त्यांनी याचा विचार करावा असे वडेट्टीवार म्हणाले. 

बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्यावर देखीस वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली. कापून टाका वगैरे भाषा योग्य नाही. बच्चू कडू यांची भूमिका शेतकरी हिताची आहे. मतदानाचा अधिकार हा तलवारीपेक्षा धारदार आहे.  एवढं त्यांना वठणीवर आणण्यासाठी पुरे आहे असे वडेट्टीवार म्हणाले. फुगवून आकडे सांगण्यात आले आहेत.  शेतकऱ्यांना पिक विम्याचे पैसै मिळत नाहीत. पिक विमाचे पैसे सरकारच्या तिजोरात जाणार आहेत.  शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये असे वडेट्टीवार म्हणाले.  प

मराठा आरक्षणाच्या संदर्भात दोन सप्टेंबरला काढलेला जीआर रद्द करायला पाहिजे

मराठा आरक्षणाच्या संदर्भात दोन सप्टेंबरला काढलेला जीआर रद्द करायला पाहिजे. कोण काय म्हणतात त्याच्याशी देणंघेणं नाही. पहिल्यांदा पात्र हा शब्द होता तो काढण्यात आला आहे. त्यामुळं नातेसंबंध, एखाद्याला ओबीसीचं प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याचा  वापर तो कुठेही करू शकतो. हे सध्या सत्तेमधील असलेल्या मंत्र्यांना समजत नसेल तर त्यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते. कारण एकदा प्रमाणपत्र भेटल्यावर त्याचा वापर कुठेही केला जाऊ शकतो. जीआर तरी चार जिल्ह्यासाठी असला तरी, त्या प्रमाणपत्राचा वापर करून महाराष्ट्रात कुठेही नोकरी मिळू शकतो. नोकरीसह आर्थिक सवलती घेऊ शकतो असे वडेट्टीवार म्हणाले. 

विजय वडेट्टीवार यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावर देखील टीका केली. आंदोलकाला बंगल्यात बोलावलं नशीब, उद्याच उपोषण मंत्र्यांचा घरी करता येईल, पुढचे उपोषण आंता मंत्र्यांच्या घरात करावं, आम्हला वाटते तेव्हा ज्यूस पाजू असे म्हणत वडेट्टीवार यांनी शिरसाटांना टोला लगावला. 

आमचे आरक्षण कोर्टामुळे वाचलं 

आमचे आरक्षण कोर्टामुळे वाचलं आहे. कोर्टाने जनगणना करा म्हणून सांगितलं, पण ते जनगणना करत नाहीत. निवडणुका घेत नाहीत. कोर्टाने वैतागून सांगितलं की तुम्ही जुन्या पद्धतीने करा, मागच्या निवडणुका जुन्या पद्धतीने झाल्या होत्या त्या पद्धतीने होत आहे. 27 टक्के आरक्षण वाचले तर अगोदरच निवडणुका का घेतल्या नाहीत? असे वडेट्टीवार म्हणाले. एकनाथ शिंदे असो की उद्धव ठाकरे असो एकमेकावर आरोप करतात त्यांनी काय करायचं त्यांना करू द्या, मी काँग्रेसमध्ये आहे, मला त्यांचं काय करायचं त्यांना जे करायचं करू द्या असे वडेट्टीवार म्हणाले. 

ओबीसी समाजाला हॉस्टेलसाठी पैसे नाहीत

ओबीसी समाजाला हॉस्टेलसाठी पैसे नाहीत. कुठलं नतभ्रष्ट सरकार आहे, 7 टक्के लोकांना तेवढे पैसे, इमारत बांधून न्याय मिळणार नाही, 12 मजल्यावरून उडी घेण्याची सोया सरकार करत आहे का? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. अशी ओबीसींची परिस्थिती आहे, दीड लाख तरुणांना 500 कोटी देऊ शकत नाही, मूर्ख बनवू नका, एक वसतिगृह इमारत झाली नाही, 36 वसतिगृह कागदावर होती, नागपुरात स्थापना झाली, 1300 पोरांना गृहीत धरुन आव आनत आहेत, ही बनवा बनवी असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. 

ओबीसीच्या 1300 पोरांना आम्ही फेलोशिप दिली

वस्तीगृह संदर्भातला निर्णय मी स्वतः घेतला होता. महाज्योती कागदावर होती ती मी सुरू केली होती. जी आम्ही योजना सुरू केल्या त्याला कट लावण्यात आला. ओबीसीच्या 1300 पोरांना आम्ही फेलोशिप दिली. आता तो आकडा 100 वर आणला आहे.  ही सगळी बनवाबनवी आहे. बिल्डिंग बांधून 2 सप्टेंबरच्या जीआर पासून एक वेगळा लॉलीपॉप देण्याचा प्रयत्न आहे हे स्पष्ट होतं असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. सगळी बोगसगिरी सुरु आहे. मतचोरी राहुल गांधी यांनी बाहेर काढल्याचे वडेट्टीवार म्हणाले. राहुल गांधी यांनी वोट चोरीचा मुद्दा आणला, हा मुद्दा राहुलजीचा आहे. त्यामुळं जो काही बोगसपणा होत आहे त्या संदर्भात मोर्चा निघत असेल तर राहुल गांधींच्या मुद्द्याला घेऊन  होत आहे. त्यामुळे सकारात्मक चर्चा करायला आम्ही तयार आहोत असे वडेट्टीवार म्हणाले. 

महायुतीत प्रचंड कुरघोडी 

महायुतीत प्रचंड कुरघोडी आहेत. एकाला शेतीमध्ये अडकून ठेवला आहे दुसऱ्याला बारामतीत अडकून ठेवला आहे. प्राण्यांना पकडण्यासाठी जाळे लावतात तसेच जाळे बारामतीत लावण्यात आले आहे. त्यामुळं यातून महाराष्ट्र कुठे घेऊन जाईल कुठे घेऊन जाणार महाराष्ट्र माझा? असं म्हणण्याची वेळ आता महाराष्ट्राच्या जनतेवर आली असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. 

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan Crime: तोपर्यंत साईट चालू करायची नाही, अन्यथा ठार मारीन; बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली खंडणी, शिंदे गटाच्या नेत्यावर गुन्हा दाखल
तोपर्यंत साईट चालू करायची नाही, अन्यथा ठार मारीन; बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली खंडणी, शिंदे गटाच्या नेत्यावर गुन्हा दाखल
Bihar Election Result 2025 RJD Winner List: बिहारमध्ये तेजस्वी यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाला किती जागा? विजयी उमेदवारांची यादी पाहा इथे...
बिहारमध्ये तेजस्वी यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाला किती जागा? विजयी उमेदवारांची यादी पाहा इथे...
Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना, भाजपचा युवा नेत्याचा मृतदेह आढळला; राजकीय वर्तुळात खळबळ
छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना, भाजपचा युवा नेत्याचा मृतदेह आढळला; राजकीय वर्तुळात खळबळ
Tejashwi Yadav : हारता हारता जिंकले! तेजस्वी यादवांनी राघोपूरचा गढ राखला, भाजपचा 14 हजार मतांनी पराभव
हारता हारता जिंकले! तेजस्वी यादवांनी राघोपूरचा गढ राखला, भाजपचा 14 हजार मतांनी पराभव
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde on Bihar Result : बिहारच्या जनतेने जंगलराज नाकारुन विकास राज स्वीकारलं
Delhi BJP Celebration : NDA ला बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, दिल्लीत जोरदार सेलिब्रेशन
PM Modi Full Speech Bihar Result : युवकांनी बिहारमधील जंगलराज संपवलं, विजयानंतरचं मोदींचं पहिलं भाषण
J. P. Nadda Delhi Speech मोदींची हॅट्रीक,बिहारच्या विजयानंतर जे. पी नड्डा यांचं भाजप मुख्यालयात भाषण
PM Modi On Bihar Result : NDA च्या विजयाने MY म्हणजे महिला आणि युवा हा नवा फॉर्म्युला बनला - मोदी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan Crime: तोपर्यंत साईट चालू करायची नाही, अन्यथा ठार मारीन; बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली खंडणी, शिंदे गटाच्या नेत्यावर गुन्हा दाखल
तोपर्यंत साईट चालू करायची नाही, अन्यथा ठार मारीन; बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली खंडणी, शिंदे गटाच्या नेत्यावर गुन्हा दाखल
Bihar Election Result 2025 RJD Winner List: बिहारमध्ये तेजस्वी यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाला किती जागा? विजयी उमेदवारांची यादी पाहा इथे...
बिहारमध्ये तेजस्वी यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाला किती जागा? विजयी उमेदवारांची यादी पाहा इथे...
Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना, भाजपचा युवा नेत्याचा मृतदेह आढळला; राजकीय वर्तुळात खळबळ
छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना, भाजपचा युवा नेत्याचा मृतदेह आढळला; राजकीय वर्तुळात खळबळ
Tejashwi Yadav : हारता हारता जिंकले! तेजस्वी यादवांनी राघोपूरचा गढ राखला, भाजपचा 14 हजार मतांनी पराभव
हारता हारता जिंकले! तेजस्वी यादवांनी राघोपूरचा गढ राखला, भाजपचा 14 हजार मतांनी पराभव
Bihar Results 2025 : यादवांची नाराजी, मुस्लिमांनी साथ सोडली; तेजस्वी यादवांच्या पक्षाच्या पराभवाची 5 मोठी कारणे
यादवांची नाराजी, मुस्लिमांनी साथ सोडली; तेजस्वी यादवांच्या पक्षाच्या पराभवाची 5 मोठी कारणे
Alinagar Election Result Updates: अलीनगरमधून मैथिली ठाकूर 11 हजार मतांनी विजयी, RJD च्या विनोद मिश्रांचा पराभव
अलीनगरमधून मैथिली ठाकूर 11 हजार मतांनी विजयी, RJD च्या विनोद मिश्रांचा पराभव
राजेंविरुद्ध शड्डू, अभिजीत बिचुकलेंचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज; म्हणाले, साताऱ्याचा 'सितारा' करतो
राजेंविरुद्ध शड्डू, अभिजीत बिचुकलेंचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज; म्हणाले, साताऱ्याचा 'सितारा' करतो
नितीश कुमारांच्या नेतृत्वातच आम्ही निवडणूक लढवल्या पण..; बिहारच्या मुख्यमंत्रीपदाबाबत फडणवीस स्पष्टच बोलले
नितीश कुमारांच्या नेतृत्वातच आम्ही निवडणूक लढवल्या पण..; बिहारच्या मुख्यमंत्रीपदाबाबत फडणवीस स्पष्टच बोलले
Embed widget