Ashok Chavan : नेत्याला पक्षात घेऊन संपवायचं ही भाजपची परंपरा, अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश त्याचाच भाग; बड्या नेत्याने तोफ डागली
Vijay Wadettiwar : इतर पक्षातील नेत्यांना पक्षात घेऊन त्यांच्या भरवशावर सामोरे जायचं आणि मग त्यांना संपवायचे ही भाजपची जुनी पद्धत असल्याची टीकाही विजय वडेट्टीवार यांनी केली.
![Ashok Chavan : नेत्याला पक्षात घेऊन संपवायचं ही भाजपची परंपरा, अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश त्याचाच भाग; बड्या नेत्याने तोफ डागली vijay wadettiwar says BJP tradition of taking the leader into the party and ending it Ashok Chavan entry into the BJP is part of it Ashok Chavan : नेत्याला पक्षात घेऊन संपवायचं ही भाजपची परंपरा, अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश त्याचाच भाग; बड्या नेत्याने तोफ डागली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/15/6c1fa93b38c14a8269a68e81caa5ac7f1718425290505736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : एखाद्या नेत्याला पक्षात घेऊन त्याला संपवायचे ही भाजपची परंपरा झाली आहे. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचा भाजप (BJP) प्रवेश हाच प्रक्रियेचा भाग असल्याची खोचक टीका काँग्रेस नेते आणि विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली. ते म्हणाले की जर तुम्हाला माहिती होते त्यांना पक्षात सामील करून घेतल्याने पक्ष पराभूत होणार आहे तर कशाला घेतलं? अशी विचारणा त्यांनी केली. इतर पक्षातील नेत्यांना पक्षात घेऊन त्यांच्या भरवशावर सामोरे जायचं आणि मग त्यांना संपवायचे ही भाजपची जुनी पद्धत असल्याची टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
बैठकीचा अजेंडा मला माहिती नाही
दरम्यान, महाविकास आघाडीची (Maha Viksas Aghadi) आज (15 जून) पत्रकार परिषद तसेच बैठक होत आहे. मात्र, या बैठकीला विजय वडेट्टीवार यांना निमंत्रण असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, बैठक कशासाठी आहे ते मला माहित नाही. मला त्या बैठकीचे निमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे बैठकीचा अजेंडा मला माहित नसल्याचे त्यांनी सांगितले.
तिथं आम्ही खरं सांगण्याचा प्रयत्न करू
भाजपकडून खोटा प्रचार करण्यात आलेल्या टीकेलाही वडेट्टीवार यांनी उत्तर दिले. त्यांनी सांगितले की, खोटारडेपणा कोणी केला? दहा वर्ष कोणी फसगत केली, संविधान बदलण्याची भाषा कोणत्या पक्षाची होती? शेतकरी उध्वस्त झाला याला कोण जबाबदार? महागाई वाढली, उद्योगपतींचे कर्ज माफ केली हा प्रचार खोटा कसा होऊ शकतो याचे उत्तर त्यांनी द्यावे, असे त्यांनी सांगितले. त्यांना उत्तर देण्यासाठी आम्ही सुद्धा यात्रा काढू, असेही ते म्हणाले. जिथे जिथे खोटे सांगण्याचा प्रयत्न करतील तिथं आम्ही खरं सांगण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले.
प्रत्येक पक्षाला कामाला लागण्याचा अधिकार
दरम्यान भाजपचे विधानसभा निवडणूक तयारीवर ते म्हणाले की, प्रत्येक पक्षाला कामाला लागण्याचा अधिकार आहे. सर्वांनी तशाच पद्धतीने आपापल्या पक्षाला सूचना दिल्याचे त्यांनी सांगितलं. दरम्यान, सांगलीच्या जागी संदर्भानेही वडेट्टीवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, सांगलीच्या जागे संदर्भात विश्वजित कदम यांची मागणी योग्य होती. त्या ठिकाणी काँग्रेसची ताकद आहे. मात्र, आघाडीमध्ये अशा गोष्टी घडत असतात. आता निवडणूक संपल्या असल्याने आम्हाला वाद वाढवायचा नसल्याचे त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)