एक्स्प्लोर

MNS: मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवणं चांगलं पण दाढीवाल्यांना मदत करणे अयोग्य, वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावरुन मनसेची एकनाथ शिंदेंवर टीका

Maharashtra Politics: वक्फ बोर्डाच्या निधी देण्यासंदर्भातल्या शासन निर्णयाला मनसेकडून विरोध. वक्फ बोर्डाला राज्य सरकारने दिलेल्या निधीनंतर मनसे नेते प्रकाश महाजन यांची टीका. राज्य सरकार आता काय करणार?

मुंबई: राज्य सरकारने वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती. ही घोषणा सध्या चांगलीच वादात सापडली आहे. या मुद्द्यावरुन अनेकजण शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य करत आहेत. यामध्ये आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) प्रकाश महाजन यांची भर पडली आहे. प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खोचक टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवणं चांगलं पण दाढीवाल्यांना मदत करणे योग्य नाही, अशी टिप्पणी प्रकाश महाजन यांनी केली. ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये देण्याचा जो शासन निर्णय घेतला आहे, या  निर्णयाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जाहीर निषेध करते. वक्फ बोर्ड ही घटनाबाह्य संस्था आहे. वक्फ बोर्ड एकप्रकारे रद्द करायला पाहिजे. या देशाचे कायदे या बोर्डाला लागू होत नाहीत.  वक्फ बोर्डाने जर एखाद्या जमिनीवर दावा सांगितला तर त्या संबंधित व्यक्तीला न्यायालय जाता येत नाही, वक्फ बोर्डाकडे जावे लागते.  नरेंद्र मोदी यांना या लोकसभेला पुरेसं पाठबळ जनतेने दिलं नाही. नाहीतर हा वक्फ बोर्डच  रद्द करण्यात आला असता, असे प्रकाश महाजन यांनी म्हटले.

लोकसभा निवडणुकीत मतं मिळाली नाहीत म्हणून राज्य सरकारकडून अल्पसंख्याक समाजाचे लांगूनचालन केले जात असेल तर ते योग्य नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात वक्फ बोर्डाची बळकटी करण्यासाठी हा निर्णय घेतला. पण मग हे सरकार हिंदूंची वळकटी करणार का?, असा सवाल महाजन यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवणं चांगलं पण दाढी वाल्याला मदत करणे योग्य नाही, असे महाजन यांनी म्हटले.

भाजप-मनसे युतीबाबत प्रकाश महाजन काय म्हणाले?

राज ठाकरे प्रेमाने चहा पाजतात. त्यामुळे अनेक जण राज ठाकरेंना भेटायला येतात.  याचा अर्थ त्यांच्यासोबत आमची युती आहे असं नाही, असे वक्तव्य प्रकाश महाजन यांनी केले.  लोकसभा निवडणुकीत मुसलमानांचे मतदान महायुतीला कमी झाले आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला असेल जेणेकरून आगामी काळात मुसलमानांची मत मिळतील.  सरकार अशाप्रकारे हिंदुत्त्वाचे रक्षण कसे करत आहे, असा सवाल प्रकाश महाजन यांनी विचारला. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या संबंधावर मनसेने बोलणे योग्य नाही: प्रकाश महाजन 

अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या 'ऑर्गनायझर' नियतकालीकातून भाजपला खडे बोल सुनावण्यात आले होते. याची चांगलीच चर्चा झाली होती. याविषयी प्रकाश महाजन यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, संघ आणि भाजप यांच्यातील  आपसातल्या संबंधावर मनसेने बोलणे योग्य नाही.जर संघ असं बोलत असेल तर भाजपला आत्मपरीक्षण करणे  गरजेचे आहे. जर संघ टीका करत असेल  इतर कोणी भाजपवर टीका करण्याची गरज नाही. संघाने जर भाजपला सल्ला दिला असेल तर तो सल्ला नसतो आदेश असतो, असे प्रकाश महाजन यांनी म्हटले.

आणखी वाचा

डोळ्यात अश्रू, बोलण्यात संताप, केतकी चितळेची महायुती सरकारवर आगपाखड; काय आहे नेमकं प्रकरण?

वक्फ बोर्ड जमीन घोटाळा; 35 हजार एकर जमिनीवर भूमाफियांनी कब्जा केल्याचा आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Embed widget