लाखो रुपये खर्च करुनही विजय वडेट्टीवारांच्या शासकीय निवासस्थानाला गळती, वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानाला गळती लागली आहे. बंगल्याला गळती लागल्यामुळं भांडी लावायला लागली आहेत.
Vijay Wadettiwar : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या शासकीय निवासस्थानाला गळती लागली आहे. बंगल्याला गळती लागल्यामुळं भांडी लावायला लागली आहेत. काही महिन्यांपूर्वीच या निवासस्थानावर लाखो रुपये खर्च करण्यात आला होता. मात्र तरीही बंगल्यात पाण्याची धार लागली आहे. आठ दिवसांपासून टेलिफोन बंद आहे. अनेक तक्रारी केल्या आहेत, मात्र काही झालं नाही असे वडेट्टीवार म्हणाले. आता दोन महिने थांबू असच, त्यानंतर सरकार येईल आमचचं असेही वडेट्टीवार म्हणाले.
वडेट्टीवार यांची सरकारवर जोरदार टीका
शासकीय निवासस्थान गळतीच्या मुद्यावरुन विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. किती घोटाळे आहेत हे यावरुन स्पष्ट होतं असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. काही महिन्यांपूर्वी याचं काम झालं आहे. कितीही योजनांचा पाऊस पाडू द्या, मात्र काहीही फरक पडणार नाही असं विजय वडेट्टीवार म्हणाले. गेल्या आठ दिवसापासून माझा टेलिफोन देखील बंद आहे. याबाबत अनेक तक्रारी देखील केल्या आहेत. मात्र काही झालं नसल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
काही दिवसापूर्वीच विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानाची दुरुस्ती केली होती
विशेष म्हणजे काही दिवसापूर्वीच विजय वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानाची दुरुस्ती केली होती. मात्र, त्यानंतर काही दिवसात पुन्हा बंगल्याला गळती लागल्याचा प्रकार घडला आहे. विजय वडेट्टीवार यांचे प्रचितीगड हे शासकीय निवासस्थान आहे. यावरुन वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. हे सरकार कंत्राटदारांची बील देऊ शकत नाही. उद्या पगार पण देणार नाहीत. अंगणवाडी सेविकांचे देखील पगार देणार नाही. या सरकारचे एकच काम चालले आहे. लाडकी बहिण, लाडका भाऊ, लाडके मामा हे सुरु आहे. यापेक्षा यांच्याकडे काहीही नाही. पण जनता याला भुलणार नसल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
स्वत: विजय वडेट्टीवार यांनी या घटनेचा व्हिडीओ करुन माहिती
दरम्यान, बंगल्याच्या गळतीनंतर स्वत: विजय वडेट्टीवार यांनी या घटनेचा व्हिडीओ करुन माहिती दिली आहे. या सरकारनं मंत्र्यांच्या बंगल्यांवर कोट्यावधी रुपयांचा खर्च केला आहे. पण तरीदेखील अशी बंगल्याची अवस्था असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. दरम्यान, आता या घटनेनंतर आणि विजय वडेट्टीवार यांनी टीका केल्यानंतर सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या: