(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vijay Wadettiwar: महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे धिंदवडे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा; विजय वडेट्टीवार यांचा घणाघात
Vijay Wadettiwar: बाबा सिद्धीकींची हत्या अतिशय दुर्दैवी घटना आहे. तशीच ती वेदनादायी आहे. घटनेची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री फडणवीसांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विजय वाडेट्टीवार यांनी केली आहे.
Vijay Wadettiwar नागपूर : माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी (Baba Siddique) हे माझे अतिशय चांगले मित्र होते. गेली अनेक वर्ष आम्ही सोबत काम केले आहे. त्यांनी राज्याच्या राजकारणात अनेक पद भूषवली. आमचे जिव्हाळ्याचे आणि मैत्रीपूर्ण संबंध होते. मात्र, बाबा सिद्धीकींची हत्या अतिशय दुर्दैवी घटना आहे. तशीच ती वेदनादायी आहे. दुसरीकडे या घटनेमुळे राज्यात कायदा सुव्यवस्था अस्तित्वात राहिली आहे का? हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. नुकताच भायखळा येतील हत्या केल्याची घटना ताजी आहे. यावरून असं दिसून आले आहे की गुन्हेगारांना पोलिसांचा वचकच उरला नाही. गुन्हेगारांना असं वाटू लागला आहे की आम्ही काहीही केलं तरी सरकार आमच्या बाजूने आहे, असेही त्यांना वाटत असेल.
मधल्या काळात घडलेली एका घटनेत तर असे दिसून आले होते की एका सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीच गॅंग पोसली होती. त्यांना समर्थन देत होते. या घटनेत राजकारण करायचे नाही. मात्र राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न एरणीवर आला आहे. अशामध्ये थोडी तरी नीतिमत्ता आणि नैतिकता शिल्लक राहिली असेल तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. या घटनेची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारून स्वतः लाच प्रश्न केला पाहिजे की आपण या पदावर राहिलो पाहिजे का? त्यांचे उत्तर त्यांना मिळाले तर त्यांनी खुशाल पदावर राहावं. अशी टीका विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली आहे.
राज्याची राजधानी यूपी आणि बिहारच्या दिशेने जात आहे- विजय वडेट्टीवार
महाराष्ट्रात पोलिसांचे दोन ग्रुप पडलेले आहेत. आपसामध्ये ओल्ड वार पोलिसांमध्ये सुरू आहे. हे ही त्यांचे एक मुख्य कारण आहे. मर्जीच्या ठिकाणी मर्जीतल्या माणसाला बसवण्याच्या हट्टापायी पोलिसांना कर्तव्य पार पाडत असताना त्यांना सुद्धा अडचणी येत आहेत. त्यामुळेच गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पोलिसांकडून अभय मिळत असल्याची भावना तयार झाली आहे. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. त्याची चौकशी होईल आणि त्यातून सत्यही बाहेर पडेल. मात्र, राज्याची राजधानी मुंबई ही यूपी आणि बिहारच्या दिशेने जात असल्याचे चित्र आहे.
याप्रसंगी राज्याचे गृहमंत्री आपली जबाबदारी सांभाळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यामुळे त्यांना त्या पदावर बसण्याचा अधिकार आहे का? त्यांनी स्वतःला विचारले पाहिजे. पुढील काही दिवसातच आचारसंहिता लागू होणार आहे. तरीदेखील त्यांना त्या पदावर राहायचा अधिकार असल्याचे वाटत असेल तर त्यांनी खुशाल राहावं आणि पुन्हा कायदा सुव्यवस्थेच्या तीन तेरां वाजत असतील तर वाजू द्यावे. त्यातून तुम्हाला केवळ खुर्चीच प्रिय आहे हे दिसून येत असल्याची बोचारी टीका ही विजय वाडेट्टीवार यांनी केली.
थोडी तरी नीतिमत्ता आणि नैतिकता शिल्लक राहिली असेल तर..
ज्या ठिकाणी सत्ताधारी पक्षातील नेत्यावरच अशा पद्धतीने गोळ्या झाडल्या जात असतील तर अवघड आहे. काल दुर्गा पुजा निमित्त अनेक लोक रस्त्यावर होते. अशावेळी जर सत्ताधारी पक्षातील नेता जर सुरक्षित राहत नसेल तर राज्यात इतर कोण सुरक्षित असेल? असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी यावेळी उपस्थित केला. महाराष्ट्रात सुरक्षा कुणाला आहे? महाराष्ट्र खरंच सुरक्षित आहे का? हा प्रश्न या निमित्ताने पुन्हा उपस्थित केला जाऊ लागला आहे. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी स्वता:च्या जाहिरातीचे बोर्ड लावण्यापेक्षा स्वतःच्या जीवाची सुरक्षा तुम्ही बघा, आम्ही तुमची सुरक्षा करू शकत नाही.
अशा आशयाचे बोर्ड लावले पाहिजे, अशा माझ्या त्यांना सूचना असल्याचेही ते म्हणाले. थोडी तरी नीतिमत्ता आणि नैतिकता शिल्लक राहिली असेल तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. या घटनेची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारून स्वतःलाच प्रश्न केला पाहिजे की आपण या पदावर राहिलो पाहिजे का? त्यांचे उत्तर त्यांना मिळाले तर त्यांनी खुशाल पदावर राहावं. असेही ते म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
रिक्षाने आले, वाट पाहिली, अन् थेट फायरिंग; बाबा सिद्दिकींवरील गोळीबाराचा कट नेमका कसा शिजला?