एक्स्प्लोर

निवडणूक आयोग भाजपच्या इशाऱ्यावर चालतोय, वडेट्टीवारांचा हल्लाबोल, म्हणाले, 6 महिन्यात 50 लाख मतदार वाढले कसे?

निवडणूक पारदर्शकपणे घेणे हे निवडणूक आयोगाचे काम आहे मात्र अलीकडच्या काळात निवडणूक आयोग हा मनू वाद्यांच्या आणि भाजपच्या इशाऱ्यावर चालत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

Vijay Wadettiwar: निवडणूक पारदर्शकपणे घेणे हे निवडणूक आयोगाचे काम आहे मात्र अलीकडच्या काळात निवडणूक आयोग हा मनू वाद्यांच्या आणि भाजपच्या इशाऱ्यावर चालत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. 2019 ते 2024 या पाच वर्षाचे 5 लाख मतदार वाढले. लोकसभा ते विधानसभा या निवडणुकीच्या 6 महिन्यात 50 लाख मतदार कसे वाढले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

निवडणूक आयोगाच्या आशीर्वादावर आलेले हे भाजप सरकार

विधानसभेवेळी 5 वाजल्यानंतर 76 लाख मतदान कसे झाले? याचे कुठलेही इतर निवडणूक आयोगाकडे नाही. भाजपच्या कार्यकर्ते असल्यासारखे वागत असल्याने निवडणूक आयोगाची स्वायत्तता नष्ट झाली. निवडणूक आयोगाच्या आशीर्वादावर आलेले हे भाजप सरकार आहे.  यामुळे आयोगाच्या कृत्यांविरोधात, लोकशाहीचे रक्षण तसेच मतदारांच्या हक्कासाठी राष्ट्रीय मतदार दिनी काँग्रेस कडून बसस्थानक चौकात विरोधी पक्ष नेते विजय वेडेट्टीवार यंच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. 

किरीट सोमय्या हे नाटकातील सोंगाड्या 

भाजपचे किरीट सोमय्या कुठली चांदणी वा तारा आहे हे कळायला मार्ग नाही. सोमय्या नाटकातील सोंगाड्या असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली. आवश्यक त्या ठिकाणी त्याला पुढे केले जाते. काम झाले की त्यांचे कपडे काडून टाकले जातात. त्यामळे त्यांना महत्त्व देण्याची गरज नाही असे वडेट्टीवार म्हणाले. ज्यांच्यावर सोमय्यांनी आरोप केले ते सगळे मंत्रीमंडळात मंत्री असून सरकारमध्ये सहभागी आहेत. त्यांनी आरोप करायचे आणि भाजपने त्यांना उचलून घायचे अश्या बेइमानी लोकांना महत्त्व देण्याची गरज नाही.

हिंदूंना मूर्ख बनवून व्होट घ्यायचा हा भाजपचा एकमेव धंदा

ज्या दिवशी भाजप हिंदू-मुस्लिम आणि मंदीर आणि मशीद यांचे राजकारण बंद करतील त्या दिवशी भाजपचे अधपटतन झालं असेल. भाजप केवळ मतांसाठी हिंदू मुस्लिम, मंदिर मशीद भारत पाकिस्तान, वोटजिहाद करीत आहे. हिंदूंना मूर्ख बनवून व्होट घ्यायचे हा एकमेव धंदा भाजपचा आहे. मुख्यमंत्री दावोसला जाऊन आलेत मात्र झालेले करार हे महाराष्ट्रातीलच कंपन्यांसोबत आहे. महाराष्ट्रातील चांगले उद्योग गुजरातला जात आहेत त्यावेळेस हे गप्प का बसत आहेत असे वडेट्टीवार म्हणाले. 

लढ म्हटलं की आम्ही लढायला तयार 

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विषयावर बोलताना हा प्रश्न हाय कमांडचा असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. प्रदेशाध्यक्ष कधी द्यायचा? कोण करायचं? हे हायकमांड ठरवीत असते. याच उत्तर माझ्याकडे नाही.  प्रदेशाध्यक्षासाठी आपण इच्छुक आहात का? यावर बोलताना हाय कमांड निर्णय घेईल त्यांनी लढ म्हटलं की आम्ही लढायला तयार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. 

 

 

 

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
Srinagar Katra Vande Bharat Express : जम्मू-श्रीनगर वंदे भारत जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रिज अन् देशातील सर्वात मोठ्या टनेलमधून धावली, -10 अंश सेल्सिअसचाही फरक पडणार नाही!
Video : जम्मू-श्रीनगर वंदे भारत जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रिज अन् देशातील सर्वात मोठ्या टनेलमधून धावली, -10 अंश सेल्सिअसचाही फरक पडणार नाही!
Pune Accident News: हिंजवडीच्या भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर, भरधाव डंपर आडवा होऊन स्कुटीवर पडला, पोरींना सावरायला संधीच मिळाली नाही
हिंजवडीच्या भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर, भरधाव डंपर आडवा होऊन स्कुटीवर पडला, पोरींना सावरायला संधीच मिळाली नाही
Ajinkya Rahane : मुंबई सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा! आऊट झाल्यानंतरही अजिंक्य रहाणे पुन्हा खेळण्यासाठी आला; पण नशीबच फुटके, VIDEO
मुंबई सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा! आऊट झाल्यानंतरही अजिंक्य रहाणे पुन्हा खेळण्यासाठी आला; पण नशीबच फुटके, VIDEO
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Jana Aakrosh Morcha : बापू आंधळे ते महादेव मुंडे! भर सभेत वाल्मिक कराडचा इतिहास काढलाMumbai Jana Aakrosh Morcha : वाल्मिक कराड किती मोठा गुंड आह? आम्ही असे लय फोडून काढलेत...ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 25 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सMumbai Jana Aakrosh Morcha : पोलिसाने मोहसिनची हत्या केली, मृतदेह जाळला; सर्वात खबळजनक दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
Srinagar Katra Vande Bharat Express : जम्मू-श्रीनगर वंदे भारत जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रिज अन् देशातील सर्वात मोठ्या टनेलमधून धावली, -10 अंश सेल्सिअसचाही फरक पडणार नाही!
Video : जम्मू-श्रीनगर वंदे भारत जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रिज अन् देशातील सर्वात मोठ्या टनेलमधून धावली, -10 अंश सेल्सिअसचाही फरक पडणार नाही!
Pune Accident News: हिंजवडीच्या भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर, भरधाव डंपर आडवा होऊन स्कुटीवर पडला, पोरींना सावरायला संधीच मिळाली नाही
हिंजवडीच्या भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर, भरधाव डंपर आडवा होऊन स्कुटीवर पडला, पोरींना सावरायला संधीच मिळाली नाही
Ajinkya Rahane : मुंबई सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा! आऊट झाल्यानंतरही अजिंक्य रहाणे पुन्हा खेळण्यासाठी आला; पण नशीबच फुटके, VIDEO
मुंबई सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा! आऊट झाल्यानंतरही अजिंक्य रहाणे पुन्हा खेळण्यासाठी आला; पण नशीबच फुटके, VIDEO
IPO Update : पैसे तयार ठेवा,आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीचा 3 हजार कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी
पैसे तयार ठेवा, पुढील आठवड्यात 3 हजार कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी
Beed News: इकडे पोलिसांचे दोन मोठे निर्णय, तिकडे धनुभाऊंनी जगमित्र कार्यालयात बैठक बोलावली, बीडमध्ये घडामोडींना वेग
इकडे पोलिसांचे दोन मोठे निर्णय, तिकडे धनुभाऊंनी जगमित्र कार्यालयात बैठक बोलावली, बीडमध्ये घडामोडींना वेग
Success Story:ड्रॅगनफ्रूटमधून हा शेतकरी वर्षाकाठी 1 कोटी कमावतोय, एका झाडाला 14-15 किलाेंची फळं, वाचा यशोगाथा
ड्रॅगनफ्रूटमधून हा शेतकरी वर्षाकाठी 1 कोटी कमावतोय, एका झाडाला 14-15 किलाेंची फळं, वाचा यशोगाथा
Jitendra Awhad : वाल्मिक कराडला सगळे का घाबरतात, त्याच्याकडे कोणाचे व्हिडीओ आहेत का? मुंबईच्या जनआक्रोश मोर्चात आव्हाडांचा धनंजय मुंडेंवरही वार
वाल्मिक कराडला सगळे का घाबरतात, त्याच्याकडे कोणाचे व्हिडीओ आहेत का? मुंबईच्या जनआक्रोश मोर्चात आव्हाडांचा धनंजय मुंडेंवरही वार
Embed widget