MNS VS Shivsena: राज ठाकरे गोंधळलेले नेते; पक्षात भांडण लावून मतांची पोळी भाजण्याचा प्रयत्न, काँग्रेस नेत्याचा हल्लाबोल
MNS VS Shivsena: उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या होत्या. या घटनेचे पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसत आहेत. यावरीत अनेक नेते प्रतिक्रिया देत आहेत.
MNS VS Shivsena: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ठाकरे गटाचे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackrey) काल ठाण्यातील रंगतनमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यापूर्वी या सभास्थळी मनसैनिक घुसले. सभास्थळी मनसैनिकांकडून गोंधळ घालण्यात आला. पोलिसांनी मनसैनिकांची धरपकड सुरु केली. मनसेच्या वतीने उध्दव ठाकरे यांच्या ताब्यातल्या गाडीवर फुगे मारण्यात आले. त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांकडून उद्धव ठाकरे (Uddhav Theackrey) यांच्या वाहनाखाली टायर जवळ सुपारी ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या गाडीवर बांगड्या, टोमॅटो, शेण फेकण्यात आलं, यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या होत्या. या घटनेचे पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसत आहेत. यावरीत अनेक नेते प्रतिक्रिया देत आहेत.
अशातच राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (vijay waddetiwar) यांनी या संपूर्ण प्रकरणावरून भाजपवर हल्लाबोल केला आहे.एबीपी माझाशी बोलताना विजय वडेट्टीवार (vijay waddetiwar) म्हणाले, राज ठाकरे गोंधळलेले नेते आहेत, मुख्यमंत्र्यांना फायदा व्हावा यासाठी उद्धव शिवसेना-मनसे पक्षात भाजपने भांडण लावले आहे, ठाण्यात झालेली ही घटना दुर्दैवी आहे. दोन पक्षात भांडण लावून मतांची पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप देखील यावेळी त्यांनी केला आहे.
ठाण्यात घडलेल्या या घटनेनंतर आता दोन्ही ठाकरे आहेत, एकमेकांना कोण पुरून उरणार ते पहावं लागणार आहे. महाराष्ट्रात वातावरण बिघडू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचे हे राज्य आहे, असंही वडेट्टीवार (vijay waddetiwar) यांनी म्हटलं आहे.
ठाण्यात नेमकं काय घडलं?
उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackrey) काल (रविवारी) ठाण्यातील रंगतनमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यापूर्वी या सभास्थळी मनसैनिक घुसले. सभास्थळी मनसैनिकांकडून गोंधळ घालण्यात आला. पोलिसांनी मनसैनिकांची धरपकड सुरु केली. मनसेच्या वतीने उध्दव ठाकरे यांच्या ताब्यातल्या गाडीवर फुगे मारण्यात आले. त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांकडून उद्धव ठाकरे (Uddhav Theackrey) यांच्या वाहनाखाली टायर जवळ सुपारी ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या गाडीवर बांगड्या, टोमॅटो, शेण फेकण्यात आलं, यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या होत्या. या घटनेचे पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसत आहेत.