Devendra Fadnavis : विधानपरिषद जिंकताच देवेंद्र फडणवीसांचा घोषणा, महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी
Vidhan Parishad Election : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेचेही मैदान जिंकले.
Vidhan Parishad Election : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेचेही मैदान जिंकले. विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या पाचही उमेदवाराचा विजयी झाला. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा चमत्कार करत महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिलाय. या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी एकच जल्लोष केला. विधानपरिषद जिंकल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. हा विजय म्हणजे महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी होय, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाच्या पाचही उमेदवारांचा विजयी झाला. आम्ही राज्यसभेच्या निवडणुकीत 123 मते घेतली होती. आता आम्ही 134 मते घेतली आहेत. महाविकास आघाडीमध्ये प्रचंड नाराजी आहे, समन्वय नाही, हे मी पहिल्यापासून सांगत होतो. सरकारवर आमदारांचा विश्वास नाही. म्हणूनच आमच्या पाचव्या उमेदवाराला विजयी केले. पाचव्या उमेदवारासाठी आमच्याकडे एकही मत नव्हते. तरिही आम्ही काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारापेक्षा जास्त मते घेतली. उर्वरित चारही उमेदवाराने जास्त मते घेतली. त्यामुळेच प्रचंड मोठा विजय झाला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांनी अडचणीत असतानाही त्यांनी विजयाला हातभार लावला, त्यांचेही फडणवीस यांनी आभार मानला.
3 पैकी 3 आणि आता 5 पैकी 5 !
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 20, 2022
राज्यसभा असो की विधानपरिषद
विजेता फक्त भाजपाच !
॥ जय महाराष्ट्र ॥ @BJP4Maharashtra #LegislativeCouncilElections #Maharashtra
आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यापद्धतीने देशात परिवर्तित करत आहेत. भारताचा विकास करत आहेत. आज महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा आहे. या निवडणुकीनं महाराष्ट्रात परिवर्तणाची नवी नांदी पाहायला मिळतेय. राज्यातील सरकारच्या विरोधातील असंतोष या निवडणुकीतून पुन्हा एकदा बाहेर आलाय. यापुढे आमचा संघर्ष असाच सुरु राहिल, आणि लोकाभिमुख सरकार आणल्यानंतरच आमचा संघर्ष संपेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
विजयानंतर भाजपचा जल्लोष -
Historic moment ! ✌🏻
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 20, 2022
Interaction with media from Vidhan Bhavan.#BJPwins#Mumbai #VidhanParishadElections #Maharashtra https://t.co/e2udYEAcYH
विधानपरिषदेतील विजयी उमेदवार
रामराजे निंबाळकर- 28
एकनाथ खडसे- 29
आमश्या पाडवी- 26
सचिन अहिर- 26
प्रवीण दरेकर- 29
राम शिंदे-30
श्रीकांत भारतीय- 30
उमा खापरे- 27
प्रसाद लाड- 28
भाई जगताप- 26