एक्स्प्लोर

जा मुख्यमंत्र्याना जाऊन सांग ही बाई मला शिव्या देतेय.. विद्यार्थ्याला शिवीगाळ करणाऱ्या महिला प्राचार्यांचा व्हिडिओ व्हायरल

आई-वडील यांच्यानंतर शिक्षक विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवत असतात. मात्र, याच गुरु-शिष्याच्या नात्याला डाग लावणारी घटना बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे समोर आली आहे.

बुलढाणा : विद्यार्थ्याला "आताच माझ्यासमोर जीव दे, मी तुझे डॉक्यूमेंट देत नाही, हे कॉलेज काही तुझ्या बापाच नाही, जा मुख्यमंत्र्याना जाऊन सांग ही बाई मला शिव्या देतेय!" असं म्हणून गरीब विद्यार्थ्याला शिविगाळ करणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या महिला प्राचार्यांचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत हा प्रकार घडला आहे.

याच शिक्षण संस्थेत डिझेल मॅकेनिकला शिकणाऱ्या आम्रपाल भिलंगे या विद्यार्थ्यासोबत ही घटना घडल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे. आम्रपाल हा शेतकऱ्याचा मुलगा असून त्याला पुढील शिक्षणासाठी त्याची मूळ कागदपत्रे शेगाव येथील आय.टी.आय.मधून हवी होती. यासासाठी त्याने प्राचार्या यांच्याकडे मागणी करत असताना त्या संतापल्या. तू आता यापुढे मला दिसू नको, आताच माझ्यासमोर मर, असं म्हणून अपमानीत करत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झालाय.

बुलढाणा जिल्ह्यातिल संग्रामपूर तालुक्यातील जस्तगाव येथील गरीब शेतकरी कुटुंबातील आम्रपाल भिलंगे हा शेगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत डिझेल मॅकेनिकल शाखेत गेल्या दोन वर्षापासून शिकत आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने व आई वडील दोघांना हृदयविकार असल्याने ते शेतीचे काम करू शकत नाही. त्यामुळे साहजिकच आम्रपाल याला शेती सांभाळावी लागली. म्हणून त्याने या वर्षी शिक्षण जवळच्या गावात घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याला पुढील शिक्षणासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत त्याचे जमा असलेले मूळ कागदपत्रे हवी होती. त्यासाठी आम्रपाल हा ते घेण्यासाठी रितसर अर्ज घेऊन प्राचार्यांकडे गेला असता त्यांनी त्याला अपमानित केले.

आम्रपाल याने विनंती करुनही प्राचार्यांनी नकार दिल्यावर आता "माझ्या करिअरबद्दल विचार करावा, माझ्या समोर आता मरण्याशिवाय पर्याय नाही!" अशी भावना व्यक्त केल्यावर ही प्राचार्यांना दया न येता तू माझ्यासमोर आताच मर, आम्ही काही तुझ्या बापाचे नोकर नाही, हे कॉलेज काही तुझ्या बापाच नाही!" यावरचं त्या थांबल्या नाहीत तर आम्रपाल याला शिविगाळ करून" जा मुख्यमंत्र्याना जाऊन सांग की ही बाई मला शिव्या देते म्हणून" सोशल मीडियात हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जर शिक्षकच विद्यार्थ्याला मर म्हणून सांगत असतील तर कस.? म्हणून आता आम्रपाल व त्याच्या आई वडिलांनी अशा उर्मट प्राचार्यांवर कारवाईची मागणी केली आहे. आमचा मुलगा पुरता खचला असून त्याने जर जीवाचं बर वाइट केलं तर आम्ही कसं जगायचं असा सवालही आम्रपालच्या वडिलांनी उपस्थित केलाय. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर माध्यम प्रतिनिधी प्राचार्या राजश्री पाटिल यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था शेगाव येथे गेले असता त्यांच्यासोबत ही राजश्री पाटिल यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन हुज्जतबाजी केली. सुरुवातीला असं काही घडलचं नाही अस म्हणून पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती केल्यावर त्यांनी हा व्हिडिओ येथील असून कालचा असल्याचं कबूल केलं. पण सदर घटनेवर त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे अशा उर्मट प्राचार्यांवर गरीब शेतकरी विद्यार्थ्याच्या भावितव्याशी खेळण्याबद्दल करवाईची मागणी जोर धरु लागली आहे.

संबंधित बातमी : 

नागपुरात गुंडाकडून शिक्षिकेला केसांना धरुन रस्त्यावर ओढत विनयभंग, विरोध करणाऱ्या पोलिसांनाही मारहाण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget