Vidarbha Weather Update : क्षणभर विश्रांतीनंतर पुन्हा विदर्भात अवकाळी पावसाचे ढग गडद; हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
IMD Weather Forecast : एकीकडे राज्यात कुठे उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे पुन्हा अवकाळी पावसाचे ढग आणखी गडद होण्याचा इशारा हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.
Vidarbha Weather Update : राज्यासह देशाच्या हवामानात अलिकडे मोठी तफावत झाल्याचे बघायला मिळत आहे. एकीकडे राज्यात कुठे उष्णतेची लाट (Heat Wave) आहे, तर दुसरीकडे पुन्हा अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) ढग आणखी गडद होण्याचा इशारा हवामान विभागाच्या वतीने (IMD) देण्यात आलाय. राज्यात काल 27 एप्रिलला वाशिमचे (Washim) कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस हे सर्वाधिक तापमान असल्याचे नोंदविण्यात आले आहे. तर आज पहाटे याच वाशिम जिल्ह्यात अवकळी पावसाने हजेरी लावली आहे. तर पुढील 48 तासात विदर्भातील (Vidarbha) जवळ जवळ सर्व जिल्ह्यात आवकळी पावसाचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून (IMD) वर्तविण्यात आला आहे.
पुढील 48 तास विदर्भाला येलो अलर्ट
विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांना आज यलो येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुढील 48 तास हा येलो अलर्ट कायम राहणार असून बुलढाणा आणि अकोला वगळता उर्वरित जिल्ह्यांत अवकाळी पाऊस, विजांच्या कडकडाटास 30-40 प्रतितास सोसाट्याचा वारा येणार असल्याचा अंदाजही नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. संभाव्य पावसाचा इशारा लक्षात घेता योग्य ती खबरदारी घ्यावी,अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत. एकीकडे राज्यात उष्णतेच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली असताना, दुसरीकडे मात्र पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असल्याने, ऐन उन्हाळ्यात पावसाळा अनुभवायला मिळतो आहे. गेल्या काही दिवसांपासून बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने अक्षरक्ष: धुमाकूळ घालत अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. तर कुठे अनेकांना यात आपला जीव देखील गमवावा लागला आहे. अशातच आता पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आल्याने संकटाचे ढग आणखी गडत होण्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
अवकाळीनं शेतातील पीक भुईसपाट
मागील चार दिवसांपासून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात अवकाळी पावसाने ब्रेक घेतला होता. मात्र आज पाहाटेपासून पुन्हा विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. याचा थेट फटका हा शेती पिकांना बसला असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं अक्षरशः थैमान घातलंय. मध्यरात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकळी पावसानं जोरदार हजेरी लावली. यामुळं शेतातील उभा मका, भातपीक अक्षरशः जमीनदोस्त झाले आहेत. तर, आंब्याचं मोठं नुकसान झालं आहे. यासोबतच बागायती पिकांचाही नुकसान झालं आहे. अनेकांच्या घरावरील छत उडाल्यानं घरातील जीवनोपयोगी साहित्याची नासाडी झाली आहे.
राज्यात वाशिम सर्वाधिक हॉट
वाशिम जिल्ह्यात काल राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद करण्यात आली असून जिल्ह्यात उष्णतेची लाट असल्याचे बघायला मिळाले होते. असे असताना आज पाहाटे पासून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात अवकळी पावसाने पुन्हा एंट्री केली आहे. आज विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया आणि वर्ध्यात अवकळी पाऊस आणि सोसाट्याचा वारा अनुभवायला मिळाला आहे. तर पुढील तीन 48 तासात विदर्भातील जवळ जवळ जवळ सर्व जिल्ह्यांमध्ये विरळ ते तुरळक पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
महत्वाच्या इतर बातम्या