Vasai crime : वसईमध्ये गुंडांची दादागिरी, 6 ते 7 नशेली गुंडांकडून एका व्यक्तीस मारहाण
वसईमध्ये गुंडांची दादागिरी पाहायला मिळाली. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास 6 ते 7 नशेली गुडांनी एका व्यक्तीस मारहाण केली आहे.
![Vasai crime : वसईमध्ये गुंडांची दादागिरी, 6 ते 7 नशेली गुंडांकडून एका व्यक्तीस मारहाण Vasai crime news seven drunken Hooligans beaten to One person in Vasai Vasai crime : वसईमध्ये गुंडांची दादागिरी, 6 ते 7 नशेली गुंडांकडून एका व्यक्तीस मारहाण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/27/970f4354b39b515f0d40695f4aea02c6_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Vasai crime: नशेमध्ये असणाऱ्या सहा ते सात गुंडांची दादागिरी रात्रीच्या सुमारास वसईमध्ये पाहायला मिळाली. रस्त्यावरुन जाणाऱ्या या नशेत असणाऱ्या गुंडांनी एका व्यक्तीला दगड, विटा, मार्बलच्या तुकड्यांनी, बेदम मारहाण केल्याची घटना घडली. त्याची युनिकॉन मोटरसायकल देखील दगड मारुन गुंडांनी फोडली आहे. शशांक शेंदरकर (वय 32) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून, त्याच्या डोक्याला, पायाला, कंबरेला, गंभीर दुखापत झाली आहे.
वसई पश्चिमेच्या चुळणा रोड गोकुळ नगरी फेज दोनच्या इथे रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा संपूर्ण थरार एका बंगल्यातील सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाला आहे. स्थनिकांच्या सांगण्याप्रमाणं या परिसरात चरस, गांज्या, ड्रग्ज पिऊन नशेली गुंड दमदाटी करुन नागरिकांना पैसे मागतात. तसेच विनाकारण मारहाण देखील करत आहेत. पोलिसांना याबाबत वारंवार तक्रारी करुनसुद्धा पोलीस यांच्यावर कोणती कारवाही करत नाहीत. त्यामुळं नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या सहा ते सात गुंडांपैकी एकाला पोलिसांनी पकडले आहे. याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)