एक्स्प्लोर
मुलींना इम्प्रेस करण्यासाठी बाईकचोरी, अल्पवयीन टोळी गजाआड
वसई : मुलींना इम्प्रेस करण्यासाठी कॉलेज तरुणांनी बाईकचोरी केल्याचा प्रकार वसई परिसरात समोर आला आहे. नालासोपारा आणि विरारमधील कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांची बाईकचोरी उघड झाली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी 5 संशयित तरुणांना ताब्यात घेतलं आहे. अटक झालेल्या 5 तरुणांमधील 4 जण अल्पवयीन आहेत. त्यांची रवानगी भिवंडीच्या बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
या टोळीने तुळींज, विरार आणि भाईंदर परिसरात चोऱ्या केल्या असून पेट्रोल संपेपर्यंत ते गाडी चालवायचे. त्यानंतर दुसरी गाडी चोरायचे. त्यांच्याकडून 6 लाखांच्या दोन रिक्षा आणि 8 मोटरसायकल जप्त केल्या आहे. फक्त मुलींना इम्प्रेस करण्यासाठी चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली आहे.
केवळ कॉलेज तरुणच नाही तर पोलिसांनी सापडलेल्या चोरीच्या बाईक स्वत: किंवा मित्राला वापरण्यास दिल्याचं समोर आलं होतं. काही दिवसांपूर्वी तुळींज पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षकाने चोरीची मोटरसायकल आपल्या मित्राला चालवण्यास दिली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधीक्षकांनी चौकशीचे आदेशही दिले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement