एक्स्प्लोर

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मराठा आरक्षण आंदोलकांची घोषणाबाजी, अहमदपूरमधील घटना, Video

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर मराठा आरक्षण आंदोलकांनी घोषणबाजी केली आहे. लातूरच्या अहमदपूरमध्ये ही घटना घडली आहे.

लातूर : महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलक आक्रमक झाल्याचं  चित्र आहे. मराठा आरक्षण आंदोलकांकडून राजकीय नेत्यांना आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली जात आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर लातूर जिल्ह्यातील अहमदपूरमध्ये घोषणाबाजी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे स्वागत स्वीकारण्यासाठी थांबले असता तिथं दाखल झालेल्या मराठा आरक्षण आंदोलकांनी घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलकांनी दिलेलं निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारलं आणि त्यानंतर ते नांदेडकडे रवाना झाला. 
 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यासमोर घोषणाबाजी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परळीतील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटनसाठी आले होते. तिथं नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला. यानंतर मुख्यमंत्र्यांना पुढील दौऱ्यासाठी रवाना व्हायचं होतं. लातूरमधील विमानतळावरुन रात्रीचं उड्डाण होत नसल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रस्ते मार्गे नांदेडला निघाले होते. यावेळी अहमदपूर येथे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यासमोर मराठा आरक्षण आंदोलकांनी घोषणाबाजी केली.

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील घटना 

अहमदपूर इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा आला असता मराठा अंदोलकांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या आहेत.आरक्षण आमच्या हक्कचे नाही कोणाच्या बापाचे अशा घोषणा देखील देण्यात आले. मुख्यमंत्री स्वागत स्वीकारण्यासाठी थांबलेले असताना तिथं मराठा आरक्षण आंदोलकांनी दाखल होत घोषणाबाजी सुरु केली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी गाडीतून बाहेर येत आंदोलकांचे निवेदन स्वीकारले आहे. 

मुख्यमंत्री परळी येथील कार्यक्रम आटोपून अहमदपूर मार्गे नांदेड कडे निघाले होते.यावेळी अहमदपूर येथे आंदोलकांनी अचानक समोर येत घोषणाबाजी केली. 
  
दरम्यान, आज मराठा आरक्षण आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यासमोर घोषणाबाजी केल्याची घटना घडली. तर, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान सुप्रिया सुळे यांचं भाषण सुरु असताना मराठा आरक्षण आंदोलक दाखल झाले होते. या आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांना मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती. आज मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीसमोर घोषणा केली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना बाजूला केलं, त्यानंतर मुख्यमंत्री नांदेडकडे रवाना झाले. 

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या : 

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी निर्णयाची वेळ पुढे ढकलली, विधानसभेचा प्लॅन गुप्त ठेवणार, इच्छूकांना केल्या महत्वाच्या सूचना

महत्त्वाच्या बातम्या

लातूर जिल्हा बँक निवडणूक! मंत्री बाबासाहेब पाटील आणि धीरज देशमुख एकाच गाडीत, राजकीय चर्चांना उधाण
लातूर जिल्हा बँक निवडणूक! मंत्री बाबासाहेब पाटील आणि धीरज देशमुख एकाच गाडीत, राजकीय चर्चांना उधाण
लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नवं समीकरण? सहकारमंत्री अन् धीरज देशमुख एकाच गाडीतून दाखल; चर्चेला उधाण
लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नवं समीकरण? सहकारमंत्री अन् धीरज देशमुख एकाच गाडीतून दाखल; चर्चेला उधाण
लातूरच्या आरोग्य विभागात मोठी खळबळ! उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड निलंबित, उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नेमकं काय घडलं?
लातूरच्या आरोग्य विभागात मोठी खळबळ! उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड निलंबित, उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नेमकं काय घडलं?
Maharashtra Drought: मोठी बातमी: राज्यात दुष्काळ जाहीर, देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 10 मोठे लाभ मिळणार
मोठी बातमी: राज्यात दुष्काळ जाहीर, देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 10 मोठे लाभ मिळणार

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
FDA Action : कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Gokul Milk Union Election : आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Mira Bhayandar Municipal Corporation BJP Corporator: रुपाली मोदींनी चप्पल फेकून मारली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारल्याचा आरोप; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR दाखल
रुपाली मोदींनी चप्पल फेकली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारला; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Embed widget