एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
फसवणूक करणाऱ्या 35 बिल्डरांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश
वसई : घराचं स्वप्न दाखवून फसवणूक करणाऱ्या 35 बिल्डरांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी दिला आहे.
नालासोपारा पश्चिमेला हुनमान नगरमधील 12 एकरवर 45 पेक्षा अधिक इमारती उभ्या आहेत. ही संपूर्ण जागा ना-विकास क्षेत्र अर्थात नॉन डेव्हलपमेंट झोन आहे. तरीही 35 पेक्षा अधिक बांधकाम व्यावसायिकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे इमारती उभारल्या. तसंच नामांकित बँकांकडून कर्ज उपलब्ध करुन ग्राहकांना ही घरं विकण्यात आली.
यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते मनोज पाटील यांनी महापालिकेला वेळोवेळी माहिती दिली. मात्र कारवाई न झाल्याने मनोज पाटील यांनी नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्याकडे तक्रार केली. यानंतर आता फसवणूक करणाऱ्या 35 बिल्डरांवर नालासोपाऱ्यात गुन्हा दाखल होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement