एक्स्प्लोर
नोटाबंदीच्या निर्णयामुळे रत्नागिरीमध्ये रुग्णांचे 20,000 रुपयापर्यंत बिल माफ

रत्नागिरी: 500 आणि 1000च्या नोटा चलनातून रद्द केल्यापासून देशात सर्वच रुग्णालयात रुग्णालयांचे नातेवाईक आणि रुग्णालय प्रशासन यांच्यात स्वीकारण्यावरुन संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यातच रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण जवळच्या डेरवणच्या वालावलकर रुग्णालयाने उपचाराकरीता येणाऱ्या रुग्णाची 20,000 रुपयापर्यंतची बिले माफ केल्याची घोषणा करुन, रुग्णाच्या नातेवाईकांना मोठा दिलासा दिला आहे. देशातील काळा पैसा रोखण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचा फटका ग्रामीण जनतेला बसत आहे. सध्या ग्रामीण जनतेकडे पैसे नसल्याने उपचारासाठी रुग्णालयाच दाखल होणाऱ्या रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी पंचाईत होत आहे. त्यामुळे जनतेला मदतीचा हात देत 20,000 हजारापर्यंतचे बिल रुग्णालयाने माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून या योजनेचा शुभारंभ झाला असून, मंगळवार 15 नोव्हेंबर 2016 ते 30 बुधवार 2016 कालावधीत रुग्णालयात अंतर रुग्ण विभागात दाखल होणाऱ्या रुग्णाचे बिल माफ करण्यात येणार आहे. यामध्ये बिलातील औषधे व विविध तपासण्यांचा समावेश करण्यात आला आहे. 20,000 हजार रकमेपेक्षा जास्त रकमेचे बिल झाल्यास वरील रक्कम रुग्णाला भरावी लागणार आहे. या योजने करता दाखल्यांची अट ठेवण्यात आली नसून, मात्र असल्यास जरुर आणावा असे आवाहनही रुग्णालयाच्यावतीने करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदीं यांनी 500 व 1000 च्या नोटा चलनातून बंद केल्याने, सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. यामुळे जनतेची गैरसोय होत आहे व खर्चाला रक्कम ही नाही. सध्याच्या पैशाच्या टंचाई बघता रुग्णालयाच्यावतीने ही योजना मर्यादित काळा करता ठेवण्यात आली असल्याच्या डॉ. सुवर्णा पाटील व प्रफुल गोडबोले यांनी जाहीर केले आहे.
आणखी वाचा























