(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विदर्भ अन् महाराष्ट्राच्या वाटल्या अर्थसंकल्पात फारसे काही नाही; तरीही विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनकडून स्वागत, नेमकं कारण काय?
Union Budget 2024: मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अर्थसंकल्पात विदर्भ अन् महाराष्ट्राच्या वाट्याला फारसे काही आले नसले तरीही विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशने या अर्थसंकल्पाचे स्वागत केलंय.
Union Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज (मंगळवारी) लोकसभेत 2024-25 या आर्थिक वर्षाचा संपूर्ण अर्थसंकल्प (Union Budget 2024) सादर केला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा हा सातवा आणि मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आहे. यापूर्वी, हे निवडणुकीचे वर्ष असल्याने, 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात कोणतेही महत्त्वपूर्ण धोरणात्मक बदल दिसून आलेले नाहीत. तसेच मध्यमवर्गीयांसाठी विशेष घोषणांचा समावेश सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पात करण्यात आलेला नाही. मात्र, या अर्थसंकल्पामध्ये (Union Budget 2024) महिला, शेतकरी, विद्यार्थी, तरूण, रोजगार यांच्यासाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
अशातच, मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अर्थसंकल्पात विदर्भ अन् महाराष्ट्राच्या वाट्याला फारसे काही आले नसले तरीही विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनकडून (Vidarbha Industries Association) या अर्थसंकल्पाके स्वागत करण्यात आलंय. उद्योग क्षेत्रासाठी अनेक योजना या अर्थसंकल्पात आहेत आणि औद्योगिक राज्य म्हणून त्याचा निश्चित फायदा महाराष्ट्राला मिळेल असा दावा विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष विशाल अग्रवाल यांनी केला आहे.
विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनकडून अर्थसंकल्पाचे स्वागत
दरम्यान, महाराष्ट्र आणि विदर्भासाठी या अर्थसंकल्पात काही मिळाले असते, तर नक्कीच त्याचा मोठा फायदा महाराष्ट्राला झाला असता. मात्र, उद्योग क्षेत्रासाठी या अर्थसंकल्पात भरपूर काही देण्यात आल्यामुळे महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राला नक्कीच त्याचा फायदा होईल, असा दावाही विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनने केला आहे. सोबतच तरुणांचा कौशल्य वाढवण्यासाठी, तरुणांना रोजगारक्षम करण्यासाठी या अर्थसंकल्पात वेगवेगळ्या योजना ही जाहीर करण्यात आल्यामुळे त्याचा ही मोठा फायदा उद्योग क्षेत्राला होईल, असेही विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन वाटत आहे.
रियल स्टेट क्षेत्रात महिलांना प्रोत्साहन आणि प्राधान्य
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प महिलांसाठी आणि खास करून महिला उद्योजिकांसाठी विशेष फायद्याचा असल्याचे मत विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या महिला उद्योजिका शाखेच्या अध्यक्ष रश्मी कुलकर्णी यांनी व्यक्त केलय. आजच्या अर्थसंकल्पात महिला आणि मुलींसाठी तीन लाख कोटींची विशेष तरतूद तर करण्यात आलीच आहे. शिवाय महिलांच्या नावाने संपत्तीची खरीद केल्यास स्टॅम्प ड्युटीमध्ये विशेष सूट देण्यात आल्याने रियल स्टेट क्षेत्रात महिलांना प्रोत्साहन आणि प्राधान्य मिळेल, असं कुलकर्णी म्हणाल्या. शिवाय स्टार्ट अप मधील गुंतवणुकीवरील एंजल टॅक्स रद्द केल्यामुळे स्टार्ट अप व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांना त्याचा विशेष फायदा होईल, असेही कुलकर्णी म्हणाल्या.
इतर महत्वाच्या बातम्या